आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईकांचे आधी हेमलता वळवींना अभिवादन नंतर नामांकन, विविध पक्षांचे एकूण 28 नामांकन अर्ज दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- नवापूर विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे पक्षाचे शिरिष नाईक यांनी कॉलेज जवळील नंदुरबार जिल्ह्याच्या प्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा दिवगंत हेमलता वळवी यांच्या पुतळ्या अभिवादन करून काँग्रेस पक्षाच्या रॅलीचा शुभारंभ केला. माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित यांची जेष्ठ कन्या व भाजपाचे उमेदवार भरत गावित यांच्या भगिनी दिवगंत हेमलता वळवी यांचा पुतळ्या पुष्पहार अर्पण करून काँग्रेस पक्षाने आदिवासी पारंपारिक ढोल ताश्याच्या गजरात रॅलीची सुरुवात केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाईक व गावित परिवार एकमेकांच्या विरोधात उभे असताना, दिवगंत हेमलता वळवींचे अभिवादन चर्चेचा विषय बनला आहे. त्यानंतर शिरीष नाईक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींना अभिवादन केले. त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन काँग्रेस पक्षांकडून 3 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शिरीष नाईक यांनी विसरवाडी सरपंच बकाराम गावित, छागन वसावे, रमेश ठाकूर यांच्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी काँग्रेस पक्षांकडून तीन उमेदवारी अर्ज तर डॉ. उल्हास वसावे यांनी एक काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार शरद गावित यांची कन्या अर्चना गावित यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर पक्षाकडून देखील अनेकांनी आज शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केले. नवापूर विधानसभा मतदार संघात आजपर्यंत एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी दिली. नवापूर विधानसभा निवडणुकीला खरा रंग आता चढणार आहे. सध्या तरी मतदार संघात गावित-नाईक-गावित अशी तिरंगी लढत असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. निष्ठावंताचा नाईक परिवार आदर करतो

नाईक परिवाराचा गावित परिवाराने किती विरोध केला. त्याचे उत्तर फुलाने दिले जाईल. दिवगंत हेमलता वळवी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत होत्या त्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत केला. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. गावित परिवाराने नाईक परिवारावर किती आरोप केले असतील त्यांचे प्रतिकार शब्दाने नव्हे तर निवडणुकीतून देऊ. जातीपातीला थारा न देता. विकासाच्या दृष्टीने आम्ही विधानसभेची निवडणुकी लढवणार आहे असे, शिरिष नाईक यांनी बोलून दाखवले.

बातम्या आणखी आहेत...