आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती विसर्जनाला गालबाेट: गणपती बाप्पाला निराेप देताना राज्यात २८ जणांना जलसमाधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/अाैरंगाबाद- लाडक्या गणपती बाप्पाला रविवारी मुंबईसह राज्यभरात वाजतगाजत निराेप देण्यात अाला. मात्र विसर्जनादरम्यान राज्यात ठिकठिकाणी जलाशयात बुडून २८ जणांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक दहा बळी विदर्भात गेले. त्यापाठाेपाठ जालना जिल्ह्यात तीन, बिलाेलीत एक, पुणे जिल्ह्यात चार तर जळगाव जिल्ह्यातही चाैघांचा मृत्यू झाला. नाशिक, मुंबई, नगर, साेलापूर जिल्ह्यात प्रत्येकी एक तर सातारा जिल्ह्यात दाेघांना जलसमाधी मिळाली. जालना शहरातील मोती तलावात बुडालेल्या तरुणांत अमोल संतोष रणमुळे (१६, लक्ष्मीनारायणपुरा, जालना), निहाल खुशाल चौधरी (२६), शेखर मधुकर भदनेकर (२०, संभाजीनगर, जालना) यांचा समावेश आहे. तर बिलोली तालुक्यातील येसगी येथे गंगाधर पिराजी बरबडे (२२) हा तरुण मांजरा नदीत बुडून मरण पावला. 


अनेक भाविकांनी केले घरातच श्रींचे विसर्जन 
दैनिक दिव्य मराठीने 'मातीचे गणपती, घरातच करा विसर्जित' असे अावाहन केले हाेते. त्याला रविवारी अाैरंगाबाद, नाशिकसह राज्यभरातील भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी शाडू मातीच्या मूर्तीचे घरातील कुंडात किंवा परिसरात उभारलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. तर काहींनी मूर्ती दान करण्यास पसंती दर्शवली. 


मुंबई : पाच भक्तांना वाचवले 
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सोमवारी सकाळी गिरगावात पोहोचली. चौपाटीवर राजाचे विसर्जन पाहण्यासाठी भक्त बोटींतून समुद्रात गेले होते. या वेळी एक बोट अचानक उलटली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडणाऱ्या पाचही जणांना बाहेर काढले. यापैकी १६ वर्षीय मुलीस अतिदक्षता विभागात दाखल केले. 


बुलडाणा : पाच वाजंत्री ठार 
भर जहागीरचे (ता. रिसाेड)बँड पथकाचे १८ सदस्य सिंदखेडराजा येथे मिरवणुकीत बँड वाजवण्यासाठी रविवारी पहाटे जीपने जात हाेते. औरंगाबाद- मेहकर मार्गावर ब्राह्मण चिकना फाट्यावर येताच त्यांच्या वाहनाला ट्रॅव्हल्स बसची धडक बसली. यात जीपमधील ५ वाजंत्री ठार झाले तर ९ जखमी झाले. 


पुण्यात ७५ गुन्हे, ३३ डीजे जप्त; अाैरंगाबादेत डीजेच्या दणदणाटाला फाटा 
मुंबई :
न्यायालयाने दिलेल्या डीजे बंदीच्या अादेशाचे रविवारी विसर्जन मिरवणुकीत मुंबई, अाैरंगाबादसह राज्यातील बहुतांश मंडळांनी पालन केले. पुणे, नगरमध्ये मात्र काही मंडळांनी हट्ट कायम ठेवला. पुण्यात ७५ प्रकरणांत गुन्हे दाखल करून ३३ डीजे जप्त केले. तर नगरमध्ये सहा जणांवर गुन्हे दाखल झाले. बंदी धुडकावण्याचा इशारा देणाऱ्या खासदार उदयनराजे भाेसलेंच्या साताऱ्यातही बंदी पाळण्यात अाली. मिरवणुकीत राजे सहभागी नव्हते. नाशिकमध्ये भाजप अामदार बाळासाहेब सानप यांच्याविराेधात डीजे लावल्याची तक्रार दाखल झाली हाेती. मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता. 

बातम्या आणखी आहेत...