आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 28 Tourists Including Indians Killed, Over 30 Injured In Two Road Accidents In Egypt

दोन रस्ते अपघातात भारतीयांसह 28 पर्यटकांचा मृत्यू, 30 पेक्षा अधिक जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या अपघातात दक्षिण इजिप्तमध्ये बस-कारची जोरदार टक्कर, बसमध्ये 16 भारतीय होते
  • दुसऱ्या अपघातात पूर्व काहिरामध्ये 2 बसची टक्कर; एक भारतीयासह 6 जणांचा मृत्यू

काहिरा- इजिप्तमध्ये शनिवारी दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला, तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतेक लोक भारतीय होते. पहिला अपघात दक्षिण इजिप्तमधील पोर्ट सईद आणि दमित्ता शहरादरम्यान झाला. येथील एक कपडा फॅक्टरीच्या बसची कारसोबत टक्कर झाली. यात 22 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 16 भारतीय प्रवासी होते. याची माहिती भारतीय दुतावासने ट्वीट करुन दिली आहे. दरम्यान भारतीय मृतांचा आकडा अद्याप समोर आला नाही.
दुसरा अपघात पूर्व काहिरामध्ये झाला. येथे दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. अपघातात एक भारतीय आणि दोन मलेशियन महिलांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे.दुतावासाने हेल्पलाइन नंबर जारी केले

भारतीय दुतावासाने ट्विटरवर हेल्पलाइन नंबर + 20-1211299905 आणि + 20-1283487779 शेयर केला आहे. पोस्टमध्ये लिहीले की, दुतावासाचे अधिकारी स्वेज शहर आणि काहिराच्या रुग्णालयात उपस्थित आहेत.