आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये पाऊलही न ठेवता महिलेने 10 महिन्यांत कमी केले 30 किलो वजन, जेवणही करते पूर्वीपेक्षा जास्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा शरिराचा आकार मनासारखा व्हावा म्हणून लोक जिम करतात. पण या महिलेने जिममध्ये पाऊलही न ठेवता 30 किलो वजन कमी करून लोकांनी आश्चर्यचकित केले आहे. मेलबर्नमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय लुसी लिसमोरने कशाप्रकारे जिममध्ये न जाताच वजन 90 किलोहून 60 किलोवर आणले याबाबत माहिती दिली. आता लुसी लोकांना हा मार्ग सांगून वजन कमी करण्यासाठी प्रेरणा देत आहे. 


हेल्दी फूडच बनले शत्रू 
- लुसीने सांगितले की, तिचे वजन वेगाने वाढले होते. त्यामुळे तिने 90 किलोचा टप्पा ओलांडला होता. त्यासाठी तिने फळे आणि भाजीपाला खायला सुरुवात केली. हे हेल्दी फूड आहे असे तिला पाटले. पण झाले उल्टे. तिचे वजन आणखी वेगाने वाढले आणि तिला स्वतःची लाजही वाटू लागली. ती कुठे जायला किंवा लोकांना भेटायलाही घाबरत होती. हेल्दी डाएट घेऊनही तिचे वजन वेगाने वाढले. त्यामुळे काय करावे हेच तिला समजत नव्हते. लुसी म्हणाली. मी अनेक डाएट फॉलो केले पण कशाचाही परिणाम जाला नाही. वाढत्या वजनाने ती त्रासली होती. 


अशी झाली चूक 
- सर्वामुळे कंटाळलेल्या लुसीने सर्वात आधी डॉक्टरकडून तपासून घेतले. डॉक्टरांनी डाएटिशनच्या मदतीने तपासणी करून तिच्या डाएटमध्ये समावेश असलेल्या साखरेमुळे वजन वाढत असल्याचा निष्कर्ष काढला. 
- लुसीला वाटले ती, ती लंच आणि डिनरमध्ये हेल्दी जेवण खात होती. पण दिवसाची सुरुवात होताच ती भरपूर कॉफी आणि मफीन खायची. त्यात प्रचंड शुगर असायची. 


पूर्ण डाएट बदलली आणि परिणाम जाणवला. 
- लुसी जे पदार्थ हेल्दी समजून खात होती, त्यानेच तिचे वजन वाढत होते. डाएटिशनने सर्वात आधी तिच्या जेवणातून साखरेचे पदार्थ कमी केले. त्यानंतर त्यात अशा काही पदार्थांचा समावेश केला जे ऐकूण लुसीला धक्का बसला. 
- तिच्या नव्या डाएटमध्ये अशा काही पदार्थांचा समावेश होता, जे लुसीने अलहेल्दी समजून खाणे सोडले होते. डॉक्टर्सने सांगितले की, लुसीने अंडी, चिकन आणि फिशसह अनेक चांगले पदार्थ सोडले होते. पण त्यात भरपूर प्रोटीन असते हे ती विसरली होती. 
- नव्या डाएटमुळे पाहता पाहता जिमला न जाताही महिन्यातच तिने 3 किलो वजन कमी केले. त्यानंतरच्या 10 महिन्यांत तिचे वजन 30 किलोपर्यंत कमी झाले. 
- लुसीचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकांना धक्का बसला. ती म्हणाली, यामुळे माझ्यामध्ये जो बदल झाला तो व्यक्त करणे कठीण आहे. मला प्रंचड सकारात्मकता जाणवते. यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला आहे. 


हे डाएट केले फॉलो 
- ब्रेक फास्ट : गार्लिक मशरूम, भाजलेले टमाटर, पालक सूप आणि अंडी 
- मॉर्निंग स्नॅक्स : केळी 
- लंच : व्हेजीटेबल मिक्स आणि चिकन ब्रेस्ट
- ईव्हीनिंग स्नॅक : डार्क चॉकलेट आणि ड्रायफ्रूट
- डिनर : सेलमन फिश आणि सलाड 

बातम्या आणखी आहेत...