आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळ छापा प्रकरण : २८१ काेटींचे वसुली रॅकेट पकडले, दिल्लीत एका पक्ष कार्यालयात २० काेटी पाेहाेचवले : प्राप्तिकर विभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/भाेपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांकडे छापे मारल्यानंतर प्राप्तिकर विभागाने साेमवारी राज्यात माेठे वसुली नेटवर्क असल्याचा खुलासा केला. सीबीडीटीनुसार एका संघटित रॅकेटने व्यावसायिक, नेते व नाेकरशहांच्या माध्यमातून २८१ काेटी रुपये जमवले हाेते. या रकमेचा एक माेठा भाग दिल्लीत एका माेठ्या राजकीय पक्षाच्या मुख्यालयात पाठवला. यासह हवालामार्फत नुकतेच २० काेटी रुपये दिल्लीच्या तुघलक रोडवरील एका ज्येष्ठ पक्ष पदाधिकाऱ्याच्या घरून पक्ष मुख्यालयात पाठवले.दिल्लीत २३० काेटी रुपयांची अघोषित देवाण-घेवाण, खाेट्या बिलांच्या माध्यमातून २४२ काेटींहून अधिक रक्कम इतरत्र वळवल्याचे पुरावे मिळाले आहेत. 

 

वृत्तांमध्ये दावा- काँग्रेसच्या अकाउंटंटच्या घरी छापा, अहमद पटेल हेही आले

सीबीडीटीच्या खुलाशानंतर माध्यमांतील काही वृत्तांमध्ये दावा केला गेला की, हवालाच्या माध्यमातून दिल्लीत पाठवलेले २० काेटी रुपये काँग्रेसकडे गेले आहेत. आयकर विभागाने एस.एम.मोईन नावाच्या व्यक्तीच्या घरी छापा मारल्यानंतर त्यास चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेलांसाेबत त्याचे छायाचित्रही समाेर आले. तथापि, हे छायाचित्र खरे की खाेटे, याची पुष्टी झालेली नाही; परंतु मोईन हा काँग्रेस कार्यालयात अकाउंटंट असल्याचे सांगितले जात आहे. ताे सोमवारी कार्यालयात न आल्याने पटेल हे त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले हाेते.

बातम्या आणखी आहेत...