आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वित्झर्लँड सरकारची नीरव मोदी विरोधात मोठी कारवाई, नीरवसह बहिणीचे 283 कोटी रूपये केले सीझ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी व हिरा व्यापारी नीरव मोदी विरोधात स्वित्झर्लँड सरकारने मोठा कारवाई केली. भारत सरकारच्या विनंतीवर स्वित्झर्लँडच्या अधिकाऱ्यांनी नीरव मोदी आणि तिची बहीण पूर्वी मोदीचे बँक खाते गोठवले आहे. नीरव आणि पूर्वी दोघांचे 4 बँक खाते होते. यात जवळपास 283 कोटी रूपये जमा होते. 

 

मनी लॉन्ड्रिंगचे आहे प्रकरण 
ईडीने स्विस अधिकाऱ्यांकडे बँक खाते सीज करण्याची विनंती केली होती. ईडीच्या मते हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी निगडीत आहे. यामुळे सदरील पैसा भारतीय बँकांमधून चुकीच्या मार्गाने स्विस बँकेत घेण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्विस अधिकाऱ्यांना सांगितले होते. तब्बल 13 हजार कोटींचा हा घोटाळा करण्यात आला आहे.  


नीरवला 19 मार्च रोजी लंडनमध्ये झाली होती अटक 
नीरव मोदीला 19 मार्च 2019 रोजी लंडन येथून अटक करण्यात आली होती. अटकेपासून तो साउथ-वेस्ट लंडनच्या वांड्सवर्थ तुरुंगात कैद आहे. नीरवच्या वकिलाने जामीनासाठी 20 लाख पाउंड जमा करण्यास तयार होता. पण साक्षीदारांना धमक्या मिळत असल्याचे सांगत न्यायाधीशांनी जामीन नाकारला होता. कोर्टाने आतापर्यंत चारवेळेस नीरवचा जामीन नाकारला आहे.