आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Attack: एकाच ठिकाणी पुरले 29 चिमुकल्यांचे मृतदेह, कब्र खोदणा-या मजुरांचेही डोळे पाणावले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सना - येमेनच्या एका शालेय बसवर झालेल्या हल्ल्यात त्यातील 29 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या सर्वांना एकाच कब्रस्तानात दफन करण्यात आले आहे. पांढऱ्या कफनमध्ये गुंडाळलेल्या अगदी लहान-लहान मुलांना हातात धरून एक-एक करून कब्रीत दफन करणाऱ्या लोकांचे काय हाल झाले असतील याची कल्पनाही करता येणार नाही. कब्री खोदण्यासाठी आलेल्या मजुरांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा पाणावले. येमेनमध्ये गुरुवारी सौदी अरेबियाचे हवाई हल्ले झाले. त्यातील एक मिसाइल या लहान मुलांच्या बसवर धडकली. एकूणच या हल्ल्यांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 29 चिमुकल्यांचा समावेश होता. सोबतच यामध्ये 77 लोक जखमी देखील झाले आहेत. 

 
नाश्ता करण्यासाठी थांबली होती स्कूल बस
हौथी बंडखोर नियंत्रित सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे शालेय विद्यार्थी सादाह परिसरात पिकनिकवर निघाले होते. याच दरम्यान पाणी आणि नाश्ता निमित्ताने ती बस एका बाजारात थांबली. त्याचवेळी सौदी अरेबियाचे हवाई हल्ले झाले. या सर्व मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी होते. 

 
सौदी आघाडीने दिले स्पष्टीकरण...
सौदी आघाडीचे प्रवक्ते कर्नल तुर्की अल-मलिकी यांनी सांगितल्याप्रमाणे, मिसाइलचे लक्ष्य बसमध्ये असलेली लहान मुले नव्हतीच. टार्गेट करताना आम्ही निर्धारित नियमांचे पालन करतो. आमचा निशाणा हौथी बंडखोर होते. हेच बंडखोर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लहान मुलांना शील्ड म्हणून वापरतात असे आरोप सौदीने लावले आहेत. सौदी प्रेस एजन्सीने सुद्धा या हल्ल्यात वैध ठरवले. सोबतच, आपला निशाणा त्या बंडखोरांवर होता जे नागरिकांवर हल्ल्याचा कट रचत होते. 

 
3 वर्षांपासून येमेनमध्ये यादवी...
गेल्या 3 वर्षांपासून येमेनमध्ये यादवी आणि संघर्ष पेटला आहे. 2015 मध्ये अब्दरब्बूह मन्सूर हादी यांना निवडणुकीत विजय मिळाला. त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथही घेतली. परंतु, या निवडणुकीच्या विरोधात हौथी बंडखोरांनी सशस्त्र उठाव केला आणि राजभवनावर हल्ला करून राजधानी सनावर ताबा मिळवला. सौदी अरेबियाने या हल्ल्यापासून राष्ट्राध्यक्ष हादी यांना वाचवले आणि येमेनचे दुसरे सर्वात मोठे शहर अदेन येथे जाण्याची व्यवस्था केली. तेव्हापासून राजधानी सना येथे बंडखोरांचे सरकार आणि अदेन येथून आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले सरकार चालत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी संघर्ष उफाळून आला. यात हौथी बंडखोरांना सीरिया आणि इराणचा पाठिंबा असल्याचे आरोप होतात. तर हादी सरकारला सौदी अरेबियाचा खुला पाठिंबा आहे. या संघर्षात आतापर्यंत 10 हजार लोक मारले गेले आणि 50 हजार नागरिक जखमी झाले. 

बातम्या आणखी आहेत...