आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंड्यातील \'त्या\' चोरीच्या तपासाला 5 पथके रवाना; पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा- शहरातील मुख्य बाजार पेठेत असलेल्या वर्धमान ज्वलर्समधील चोरीच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आर. राजा सामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी खांबे यांनी तपासकामी ५ पथक नियुक्त करून विविध ठिकाणी तपास सुरू करण्यात आला आहे, अशी पोलिस निरीक्षक राजेंद्र मोताळे यांनी गुरुवारी (दि.१०) दिली. 

 

शहरातील वर्धमान ज्वेलर्स फोडून अज्ञात दरोडेखोरांनी सोने चांदी व रोकड असा एकूण २९ लाख ५५ हजाराचा ऐवज लुटून नेल्याची घटना बुधवारी (दि.९) पहाटे घडली होती. या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांना आव्हान असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी खांबे शहरात ठाण मांडून आहेत. यासाठी पाच पथकाची नेमणूक केली असून यामध्ये ५ पोलिस अधिकारी, उस्मानाबाद स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व परंडा पोलिस कर्मचारी नियुक्त करून तपासाची चक्रे वेगाने सुरू केले आहेत. 

 

पोलिस प्रशासना समोर मोठे आव्हान : 
अज्ञात ७ ते ८ दरोडेखोरांनी अशाच पद्धतीने नान्नज जवळा (ता.जामखेड. जिल्हा अहमदनगर) येथील एका सराफा दुकानात गुरुवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास चोरी करून चांदीचा ऐवज लुटल्याची घटना घडली. त्यामुळे उस्मानाबाद व नगर या दोन्ही जिल्ह्यातील पोलिस दरोडेखोरांच्या मागावर असून पोलिसांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

 

दोन्ही घटनेतील दरोडेखोर एकच असल्याचा संशय 
परंडा व नान्नज जवळा (ता.जामखेड) येथील चोरी गुरुवारी मध्यरात्री घडली असून दोन्हीही घटनेतील दरोडेखोरांचे पेहराव व तोंडाला मास्क बांधने दुचाकी बंद करून चालवत घटनेच्या स्थळी येवून शटर उचकटले व आत प्रवेश करून चांदीचा ऐवज लुटला. या सर्व हालचाली सीसीटिव्हीत कैद झाल्या आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...