आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजप्रताप यादव VS एेश्वर्या राय..सातफेरे घेतल्यापासून ते 1 सप्टेंबरपर्यंत असे होते दाम्पत्यामधील संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजिव तेजप्रताप यादव यांनी विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांतच पत्नी एेश्वर्या रायशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या तेजप्रताप यांच्या अर्जाला एेश्वर्याचे नातेवाईक उत्तर देणार आहेत. तेजप्रताप यांनी पत्नी एेश्वर्या हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याच आधारावर तेजप्रताप यांनी पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एेश्वर्याच्या कुटूंबीयांनी तेजप्रताप यांची समज काढण्याचा प्रचंड प्रयत्न केला. परंतु तेजप्रताप हे आपल्या न‍िर्णयावर ठाम आहेत.

 

आता भेट थेट कोर्टात..

तेजप्रताप यांच्या निर्णयापुढे यादव कुटूंबीयही हतबल झाले आहेत. दुसरीकडे, ऐश्वर्या हिचे नातेवाईक ही काडीमोड होणार नाही, याच्या प्रयत्नात आहेत. याप्रकरणी येत्या गुरूवारी (ता. 29) सुनावणी होणार आहे. ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांनी आपल्या कन्येवर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. बिहारचे माजी मंत्री आणि तेजप्रतापचे सासरे चंद्रिका राय यांच्या परिवाराने घटस्फोटाच्या अर्जाची सर्टीफाइड कॉपी घेतली आहे. 

 

ऐश्वर्याने वडिलांसाठी छपरा येथील उमेदवारी मागितली होती- तेजप्रताप
ऐश्वर्याला आपल्या वडिलांसाठी छपराचे (सारण) लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. यासाठी तिने आपल्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. तिने अनेक वेळा बोलून दाखवले आहे की, माझ्या वडिलांना छपराची उमेदवारी दिली नाही तर तुझ्याशी लग्न करण्याचा फायदा काय? असे तेजप्रताप यांनी सांगितले आहे.

 

तेजप्रताप यांनी कोर्टात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत लग्नाचा दिवस अर्थात 12 मे ते 1 सप्टेंबरपर्यंत दोघांमधील संबंधाविषयी सर्व माहिती लिहिली आहे. त्यात तेजप्रताप यांनी पत्नीवर मानसिक छळासोबतच अनेक घणाघाती आरोप केले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...