आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये २९९६ अंकांची भर, पुन्हा ४० हजारीसाठी सज्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - शेअर बाजारात सोमवारी सलग दुसऱ्या सत्रांत तेजी दिसली. सेन्सेक्सने १०७५ अंकांची उसळी घेत ३९०९० ही पातळी गाठली. हा दोन महिन्यांतील उच्चांक आहे. निफ्टी ही ३२६ अंकांनी वाढून ११६००.२० वर स्थिरावला. शुक्रवार व सोमवारी सेन्सेक्स एकूण २२९६.५६ अंकांनी आणि निफ्टी ८९५.४० अंकांनी वधारला.
 

सेन्सेक्स : टॉप गेनर 
बजाज फायनान्स :   8.7% 
(शुक्रवारी १०.१९% वाढ होती)
एल अँड टी  :   8.13%
एशियन पेंट्स  :   7.89%
आयटीसी  :   6.95%
अॅक्सिस बँक :   6.81%
 

बाजार भांडवल दोन दिवसांत १०.३५ लाख कोटींनी वाढले 
> सोमवारी सेन्सेक्स २.८%नी वाढला, तर निफ्टी २.९% वाढला.  
>बीएसईचे बाजार भांडवल गुरुवारी १३८.५५ लाख कोटी रु. होते. आता १४८.९० लाख कोटी रु. झाले आहे.
 

वाढीची दोन कारणे :
सरकारने शुक्रवारी कंपनी करात ८% कपातीची घोषणा केली होती. हे प्रमुख कारण आहे.
> पेट्रोनेट एलएनजी- अमेरिकी कंपनीतील करारामुळे तेल आणि वायू क्षेत्रात तेजी आली आहे.

बातम्या आणखी आहेत...