आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Big Films To Be Released On August 15; The Release Date Of 'Batla House' Will Change?

15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार 3 मोठे चित्रपट; सर्वात मोठी टक्कर असल्याच्या तज्ञांच्या प्रतिक्रिया, 'बाटला हाऊस'चे निर्माते बदलतील का रिलीज डेट?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - या वर्षी १५ ऑगस्ट रोजी ३ चित्रपट 'मिशन मंगल', 'साहो' आणि 'बाटला हाऊस' रिलीज होतील. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बॉक्स ऑफिसवरील टक्कर मानली जात आहे. यापैकी एखाद्या चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे कोणतेच संकेत आतापर्यंत मिळालेले नाहीत. तथापि, ट्रेड अॅनालिस्ट आमोद मेहरा यांचे म्हणणे आहे की, या चित्रपटांपैकी 'बाटला हाऊस'चे प्रदर्शन स्थगित होऊ शकते. ते म्हणतात, 'माझ्या मते 'बाटला हाऊस'चे निर्माते ही टक्कर कायम ठेवत पब्लिसिटी स्टंट करत असावेत, जेणेकरून त्यांच्या चित्रपटाला प्रसिद्धी मिळेल. त्यानंतर याचे प्रदर्शन स्थगित केले जाईल व फक्त 'मिशन मंगल' व 'साहो' यांच्यातच टक्कर होऊ शकते.' 


एकीकडे अमोद यांचे म्हणणे आहे की, या टक्करमध्ये 'साहो' सुपरहिट ठरेल, तर दुसरीकडे नरेंद्र यांना वाटते की, अक्षयचे पारडे जड आहे.