आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ अपत्ये : भाजप नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे पद रद्द; काँग्रेसच्या पारसेकर यांच्या याचिकेवर निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक २६ ब मधील भाजपच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांना तीन अपत्ये असल्यामुळे त्यांचे नगरसेविका पद रद्द करण्यात आलेे आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. 


काँग्रेसच्या पराभूत उमेदवार उमा पारसेकर यांनी चव्हाण यांना तीन अपत्ये असल्यामुळे त्यांची निवड रद्द करावी, अशी इलेक्शन पिटीशन दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली. चव्हाण यांना तीन अपत्ये असल्याबद्दल मूळ निवडणूक अर्जामध्ये, प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे नोंदी आहेत. 


शासकीय रुग्णालय व महापालिकेकडूनही तीन अपत्येे असल्याचे व जन्मदाखल्यांवर रजिस्टर नोंद आहे. रेशन कार्डवर ही नोंदी आहेत. यावरून त्यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध होते. यामुळे निवडणुकीस उभारण्यास अपात्र आहेत, असा युक्तिवाद अॅड. व्ही. एस. आळंगे यांनी केला. 


न्यायालयात ही बाब समोर आल्यामुळे चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, रेशन कार्ड विभागाचे अधिकारी, सोलापूर महापालिका जन्म नोंद अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्रतिनिधी, यांचेही लेखी जबाब नोंदविण्यात आले होते. अर्जदार पारसेकर यांच्याकडून अॅड. आळंगे, चव्हाण यांच्यातर्फे अॅड. एन. के. शिंदे यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...