Home | National | Other State | 3 Congress Lawmakers In Mumbai Hotel With BJP Leaders: Karnataka Minister

कर्नाटकातील काँग्रेसचे 3 आमदार मुंबईत भाजप नेत्यांच्या भेटीला, गुप्त बैठकीत सरकार पाडण्याचा कट; डी.के. शिवकुमार यांचा दावा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:04 PM IST

भाजपला या कथित कटकारस्थानात यशस्वी होऊ देणार नाही असा दावा शिवकुमार यांनी केला.

  • 3 Congress Lawmakers In Mumbai Hotel With BJP Leaders: Karnataka Minister

    मुंबई / बंगळुरू - कर्नाटक काँग्रेसचे तीन आमदारांनी मुंबईत भाजप नेत्यांसोबत गुप्त चर्चा केल्याचे आरोप कर्नाटकच्याच एका मंत्र्याने केला आहे. कर्नाटकात मंत्री पदावर कार्यरत असलेले काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजप राज्यातील आघाडी सरकार पाडण्याचा कट रचत आहेत. निवडणुका संपल्या आणि सरकारही स्थापित झाले. तरीही भाजपकडून घोडेबाजारी संपलेली नाही. एवढेच नव्हे, तर त्या काँग्रेस आमदारांसोबत भाजपने काय चर्चा केली, त्यांना कशा स्वरुपाची ऑफर दिली आणि किती ऑफर दिली या सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला आहे असेही शिवकुमार यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.


    > 2008 मध्ये कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' हा शब्द खूप गाजला होता. त्यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावर बीएस येद्दियुरप्पा होते. त्यांनी कथितरित्या इतर पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे घेऊन सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्यांचे आमदार पळवण्याच्या भाजपच्या कथित राजकारणाला ऑपरेशन लोटस असे नाव देण्यात आले होते. शिवकुमार कर्नाटकात काँग्रेसचे तारणहार मानले जातात. त्यांनी यापूर्वीही पक्षाला अनेक संकटांतून बाहेर काढले आहे. त्यांनीच कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
    > कुमारस्वामी राज्यात भाजपवर सौम्य आहेत असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "आमचे (कर्नाटकचे) मुख्यमंत्री भाजपवर सौम्य आहेत. सौम्य म्हणण्याचा माझा अर्थ असा की त्यांना काही गोष्टी माहिती असूनही ते त्याचा खुलासा करत नाहीत. जवळपास सर्वच आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना राज्यात सुरू असलेल्या कटकारस्थानांची माहिती दिली. यासंदर्भात आमदारांनी सिद्धरमैय्या यांनाही सांगितले आहे."
    > मुख्यमंत्री सध्या फक्त थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका घेत आहेत. मी त्यांच्या जागी असतो तर 24 तासांत सर्वांचा भांडाफोड केला असता. केवळ माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या कर्नाटक प्रदेशाध्यक्षांना सुद्धा या गोष्टी माहिती आहेत. तरीही आपण भाजपचा कट यशस्वी ठरू देणार नाही असे शिवकुमार यांनी सांगितले आहे.

Trending