आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : विद्यार्थिनीच्या अपहरणासाठी आलेल्या 3 गुंडांची जमावाकडून हत्या, पोलिस बघ्याच्या भूमिकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या बेगूसरायमध्ये शुक्रवारी जमावाने तीन गुंडांची बेदम मारहाण करत हत्या केली. हे तीन गुंड एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यासाठी नारायणपीपर गांवातील शाळेत गेले होते. जेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांचा विरोध केला तेव्हा त्यांनी मुख्याध्यापकांना मारहाण केली आणि हवेत फायरही केले. याचदरम्यान गावकऱ्यांना गुंडांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आलेल्या जमावाने तीन गुंडांना पकडले आणि बेदम चोपले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला. 


या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक शाळेकडे रवाना झाले. शिपायांनी गर्दीच्या तावडीतून गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या लोकांनी पोलिसांना पळवून लावले. त्यानंतर पोलिसांसमोरच तिघांनाही लाठ्या-काठ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. 


मुख्याध्यापकांसह संशयितांची चौकशी 
एसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, तपासादरम्यान घटनास्थळावरून एक शस्त्र सापडले आहे. या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांसह काही संशयितांची चौकशी केली जात आहे. लवकरच हत्येमध्ये समावेश असलेल्या आरोपींना अटक केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...