आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सारंगखेड्यात यंदा 3 कोटींचा घोडेबाजार; विविध राज्यातून सुमारे अडीच हजार घोडे विक्रीसाठी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा- घोड्यांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा जि.धुळे ) येथील घोडे बाजाराने यंदा तीन कोटी रुपयांचा पल्ला गाठला आहे. यावर्षी विविध राज्यातून सुमारे अडीच हजार घोडे सारंगखेड्यात विक्रीसाठी आले होते. त्यापैकी ८९८ घोड्यांची विक्री झाली. त्यातून ३ कोटी ४ लाख ७२ हजार ९०० रुपयांची उलाढाल झाली.

 
दरवर्षीप्रमाणेच यंदाही जातिवंत घोड्यांना प्रचंड मागणी होती. आजपासून सैन्य दलाचे साहसी खेळ व लावणी स्पर्धेने चेतक फेस्टिव्हलची रंगत आणखी वाढणार आहे. यात्रोत्सवाच्या निमित्ताने भरलेला हा घोडे बाजार आणखी ८ दिवस चालणार आहे. त्यामुळे उलाढाल ४ कोटी रुपयांच्या उलाढालीला स्पर्श करेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. घोडे बाजारात आजपर्यंत दुसाने येथील रोहित पाटील यांच्या घोड्यावर किमतीची सर्वाधिक रुपयांची बोली लागली. पाच लाख ७१ हजार रुपये मोजून त्यांचा हा घोडा विकत घेण्यात आला. 

 

दरम्यान, चेतक फेस्टिव्हलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय टेट पेकिंग स्पर्धेसाठी सैन्य दल, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसह कोलकाता येतील अन्य संघही सारंगखेड्यात दाखल झाले आहे. २ जानेवारीपासून या स्पर्धांना सारंगखेड्यात सुरुवात होईल. या स्पर्धामध्ये धावत्या घोड्यावरून भाल्याच्या साह्याने जमिनीवरील वस्तू उचलणे, तलवारीने निशाणा साधने आदी मैदानी प्रकार होतील. या स्पर्धा अश्व प्रेमींना चकित करणाऱ्या आहेत. या खेळाचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे समितीचे अध्यक्ष जयपाल सिंह रावल यांनी सांगितले आहे.