आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कंटेनरने चिरडले, दुचाकीवरील 3 युवक ठार, धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडणे (जि. धुळे) - मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. मृतांपैकी दोन जण धुळे तालुक्यातील असून तिसरा तरुण चाळीसगाव तालुक्यातील आहे. 


मुंबई-आग्रा महामार्गावरून मंगळवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या कंटेनरने सरवडकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात तिन्ही तरुण दुचाकीसोबत कंटेनरच्या चाकाखाली २०० फूटांपर्यंत फरपटत गेले. दुचाकी कंटेनरच्या चाकाखाली अडकल्याने तिचा चेंदामेंदा झाला. हेमंत रामेश्वर पाटील (१८), सुनील नाना महाले (२७), भुरा जगन निकम (२९) हे तरुण जागीच ठार झाले. बुरझड येथील हेमंत रामेश्वर पाटील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. हेमंत पाटील गेल्या सहा वर्षांपासून नंदाणे येथे वास्तव्यास होते. नंदाणे येथील सुनील नाना महाले यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सुनील महाले व हेमंत पाटील यांच्या घराची परिस्थिती बिकट असल्याने ते मजुरीचे काम करत होते. 

बातम्या आणखी आहेत...