आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुळ ओलांडताना लाेकलला साडी अडकून एकाच कुटुंबातील 3 ठार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुळ अाेलांडत असताना साडी लाेकलला अडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू हाेण्याची घटना रविवारी दुपारी मुंबईत घडली. या दुर्घटनेत दाेन वर्षांच्या एका बालिकेचाही बळी गेला. काेपर येथील वंझारे कुटुंब रविवारी एका कार्यक्रमानिमित्त काेपर पश्चिम येथे गेले हाेते. कार्यक्रम संपल्यानंतर सुमीता वंझारे (६२), प्रीती उदय राणे, नीलेश उदय राणे (२) हे रूळ अाेलांडण्याचा प्रयत्न करीत हाेते. तेव्हा अप अाणि डाऊन या दाेन्ही दिशेने भरधाव लाेकल अाल्या. त्यावेळी सर्वच जणांचा गाेंधळ उडाला व ते दाेन्ही ट्रॅकच्या मधाेमध थांबले. त्याचवेळी सुमीता वंझारी यांची साडी लाेकलला अडकली. त्यांच्याबराेबर प्रीती राणे अाणि दाेन वर्षांचा बालक नीलेशही लाेकलखाली आले अाणि तिघांचा जागीच मृत्यू झाला. 


 

बातम्या आणखी आहेत...