आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसरमध्ये प्रार्थना स्थळावर ग्रेनेड हल्ला, 3 जणांचा मृत्यू; दुचाकीवर चेहरे झाकून आले होते हल्लेखोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - अतिरेकी घुसल्याच्या संशयावरून पाच दिवसांपासून हाय अलर्ट जारी केलेल्या पंजाबमध्ये रविवारी दहशतवादी हल्ला झाला. अमृतसरजवळील अदलीवाल परिसरातील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना दाेन युवकांनी भाविकांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर दाेघे अाराेपी दुचाकीवर पळून गेले. या स्फाेटात ३ भाविक ठार तर २० जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे डीजीपी सुरेश अराेरा यांनी सांगितले. या हल्ल्याची एनअायए चाैकशी करत अाहे. या हल्ल्यामागे इसिस समर्थक खलिस्तानी किंवा काश्मिरी संघटनेचा हात असल्याचा संशय मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केला. पाेलिसांच्या मते, हल्ल्यासाठी वापरलेले ग्रेनेड काश्मीरहून अाणले असावे. तिथे लष्करी जवानांवर हल्ले करताना अतिरेकी असे ग्रेनेड वापरतात. ४० वर्षांपूर्वी १३ एप्रिल १९७८ राेजी पंजाबमध्ये अतिरेकी हल्ल्याची सुरुवात निरंकारी भाविकांवर हल्ल्याने झाली हाेती. त्याची माेडस अाॅपरेंडी अशीच हाेती. 

 

प्रत्यक्षदर्शींच्या मते... बाबा देेसासिंह हाेते निशाण्यावर : निरंकारी बाबा देसासिंह यांच्या सेवक सिमरजित काैर या हल्ल्यात जखमी झाल्या. त्यांचा दावा अाहे की, 'हल्लेखाेरांनी बाबा देसासिंह यांच्यावरच बाॅम्ब फेकला हाेता, मात्र निशाणा चुकला. हल्ल्याच्या वेळी मी स्टेजवर हाेते. ताेंड बांधून अालेल्या एका तरुणाने काहीतरी फेकले अाणि पळून गेला. त्यानंतर स्फाेट झाला. सर्व जण जीव वाचवण्यासाठी पळू लागले.' दुसऱ्या एका भाविकाने सांगितले, 'माझी मुलगी गेटवर सेवा देत हाेती. दाेन तरुण पिस्तूल घेऊन अात अाल्याचे तिने पाहिले. नंतर पळून बाहेर गेले.' 

 

काश्मीरचा कुख्यात अतिरेकी चार दिवसांपासून पंजाबमध्ये : सुरक्षा एजन्सींच्या मते, काश्मीरचा कुख्यात अतिरेकी जाकीर मुसा पंजाबमध्ये लपलेला अाहे. त्यामुळे या यंत्रणेने पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी केला हाेता. चार दिवस अाधी लष्करप्रमुखांनीही पंजाबमध्ये अतिरेक्यांच्या हालचाली वाढल्याचे सांगितले हाेते. दरम्यान, पाकिस्तानातून अतिरेक्यांच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रे, स्फाेटके, पैसे पाठवले जात अाहेत. काही खलिस्तानी अतिरेकी संघटनाही ग्रेनेड हल्ला करू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय अाहे. दरम्यान, रविवारच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंदिगडसह देशातील इतर निरंकारी भवनांची सुरक्षा वाढवण्यात अाली अाहे. 

 

पुलवामात दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात मुख्य हवालदार शहीद 
श्रीनगर | दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफचे मुख्य हवालदार शहीद झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले, सीआरपीएफच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला व अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलाने या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान, मुुख्य हवालदार चंद्रप्रकाश गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जात असताना सुरक्षा दलाने त्यांना घेरले. रात्री उशिरापर्यंत सुरक्षा दल व दहशतवाद्यांत गोळीबार सुरू होता. 

 

मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत
दर रविवारी शेकडो भाविक अधिवाला गावातील या प्रार्थना स्थळावर एकत्रित येतात. हल्ला झाला त्यावेळी हॉलमध्ये जवळपास 250 जण उपस्थित होते. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना मृतांच्या नातेवाइकांविषयी सहानुभूती व्यक्त केली. सोबतच त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि मोफत उपचाराची घोषणा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. 

 

I appeal to the people of Punjab to maintain peace in wake of Amritsar bomb blast. I urge them not to panic and to remain calm. We will not let the forces of terror destroy our hard earned peace.

— Capt.Amarinder Singh (@capt_amarinder) 18 November 2018

पंजाबमध्ये घुसले होते 7 दहशतवादी
पंजाबमध्ये जैश ए-मोहम्मदचे 6 ते 7 दहशतवादी घुसल्याने तपास संस्थांनी हायअलर्ट जारी केला होता. या दहशतवाद्यांनी सुरुवातीला काश्मीरात एक एसयूव्ही हायजॅक करून पंजाबात प्रवेश केला. यानंतर ते दिल्लीच्या दिशेने निघाले होते. पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचाच हात आहे का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिस घटनास्थळी लावलेले सीसीटीव्ही फुटेज घेऊन सविस्तर तपास करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...