आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजलिंगच्या भाविकांवर काळाची झडप.. जीप 250 फूट खोल दरीत कोसळली, 3 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भोजलिंगच्या भाविकांची जीप सुमारे 250 फूट दरीत कोसळली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील डोंगरावर भोजलिंग हे देवस्थान आहे. सांगलीच्या आटपाडीतील विठलामपूर गावातील भाविक जीपने देवदर्शनाला जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून जीप थेट दरीत कोसळली. या भीषण अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले असून 12 जण जखमी झाले आहे. 

 

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सध्या सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोजलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता कच्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...