आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्रपाली रिअल इस्टेट समूहाच्या ३ संचालकांना अटक; देशभरातील ४७ पैकी २८ प्रकल्प अर्धवटच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तब्बल ४२ हजार खरेदीदारांकडून पैसे घेतल्यानंतरही त्यांना फ्लॅट न देणारा रिअल इस्टेट समूह अाम्रपाली ग्रुपच्या तीन संचालकांची सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी पोलिस कोठडीत रवानगी केली. संचालक अनिल शर्मा, शिवप्रिया व अजयकुमार यांना मंगळवारी कोर्टातच अटक झाली. समूहाच्या ४६ फर्मच्या फॉरेन्सिक ऑडिटसाठी २००८ नंतर दस्तऐवज न दिल्याने फटकार लगावत कोर्ट म्हणाले, तुम्ही आमच्याशी लपंडाव खेळत आहात. सर्व दस्तऐवज मिळेपर्यंत तिघेही कोठडीत राहतील. सर्व दस्तऐवज जप्त करून फॉरेन्सिक ऑडिटर्सकडे सोपवण्याचे आदेश कोर्टाने दिल्ली आणि यूपी पोलिसांना दिले आहेत. 


फ्लॅट खरेदीदारांचे वकील एम.एल. लाहोटी कोर्टाला म्हणाले की, आम्रपाली समूहाच्या ४६ पैकी फक्त सहा फर्मनेच दस्तऐवज जमा केले आहेत. तेही अर्धवटच असून क्रम लावलेला नाही. अनेक कागदपत्रे तर कालच सोपवण्यात आली आहेत. त्यावर कोर्टाने तुम्ही कोर्टाची दिशाभूल करू पाहत असल्याची फटकार संचालकांना लगावली. संचालकांचे ही वागणूक कोर्टाचा अवमान असल्याचे सांगत त्यांना नोटीसही जारी करण्यात आली. 


देशभरातील ४७ पैकी २८ प्रकल्प अर्धवटच 
नोएडा, कोची, इंदूर, जयपूर,मथुरा, लखनऊ, नागपूर,नाशिक पुणे, मुंबई, कोलकाता चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद आदी शहरांत आम्रपालीचे एकूण ४७ गृहनिर्माण प्रकल्प आहेत. पैकी २८ प्रकल्प अर्धवटच आहेत. समूह १७ वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायात आहे. मात्र त्यांनी तब्बल ४२ हजार खरेदीदारांकडून पैसे घेऊन अद्याप फ्लॅट बनवून दिलेले नाहीत. यापैकी अनेकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...