Maharashtra Special / नागपूर विद्यापीठातील अजब प्रकार; 3 प्राध्यापकांनी फक्त 2 दिवसांत केला 1.5 लाख रुपयांचा चहा-नाश्ता, युनिव्हर्सिटीने बिल पास करण्यास दिला नकार


दोन दिवसांच्या बैठकीत प्राध्यापकांनी 99 कप चहा आणि 25 कप कॉफी पिली

दिव्य मराठी वेब

Jun 28,2019 06:16:00 PM IST

नागपूर- नागपूर विद्यापीठातून अजब प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातील 3 प्राध्यपकांनी 2 दिवसांत 1.5 लाख रुपयांच्या चहा-नाश्ता केला. विद्यापीठीत बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीदरम्यान हे चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. बिलानुसार, दोन दिवसांत प्राध्यपकांनी नाश्त्याशिवाय 99 कप चहा आणि 25 कप कॉफी पिली.


बैठकीचे हे बिल पास करण्यासाठी विद्यापीठाच्या अकाउंट विभागाकडे पाठवण्यात आले. विभागाने रक्कम पाहून बिल पास करण्यास नकार दिला. त्यानंतर बिलालाल व्हॉइस चांसलरकडे पाठवण्यात आले. त्यांनी बिल पाहून याप्रकरणाचे आदेश दिले आहेत. सोबतच बोर्ड ऑफ स्टडीजला बिल परत पाठवत स्पष्टीकरण मागितले आहे.


मे महिन्यात झाली होती बैठक
वीसींनी सांगितल्यानुसार, बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक मे महिन्यात विद्यापीठात झाली होती. यात अभ्यासक्रम आणि शैक्षणिक सत्रावर चर्चा झाली. बैठकीत बौर्डाच्या सदस्यांसाठी विद्यापीठाकडून चहा-नाश्त्याची सोय करण्यात आली होती.

यानंतर विद्यापीठ प्रशासनाने बोर्ड ऑफ स्टडीजला विचारले की, तुमच्या हिशोबाने हे बिल बरोबर असेल तर ते सिद्ध करावे. तसेच 3 जणांनी 2 दिवसांत 99 चहा आणि 35 कॉफी कशा पिल्या हे सांगावे...?

X
COMMENT