आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nagpur: कॉलेजला ट्रिपल सीट जाणा-या तरूणींच्‍या दुचाकीला क्रेनची धडक, तिघींचा मृत्‍यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामातील क्रेनच्या चाकांखाली येऊन तीन महाविद्यालयीन मृत्यूमुखी पडल्याची घटना उपराजधानी नागपुरात घडली. या घटनेवर प्रचंड रोष व्यक्त होत असून काही संघटनांनी निदर्शनेही केलीत. 


उत्तर अंबाझरी मार्गावर मंगळवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. मृत्यूमुखी पडलेल्या महाविद्यालयीन युवतींची नावे स्नेहा विजय अंबाडकर (वय १७) रा. हिलटॉप, ऋचिका विजय बोरीकर ( वय १८) रा. तांडापेठ आणि विश्रृती राजेश बनवारी (वय १८) रा. पांढराबोडी, अंबाझरी अशी आहेत. या तिघीही नागपुरातील शंकरनगरातील प्रख्यात एलएडी महाविद्यालयाच्या बीकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनी होत्या. मंगळवारी सकाळी त्या महाविद्यालयातील पहिल्या तासाला हजर होत्या. त्यानंतर महाविद्यालयातून ऋचिकाच्या मोपेडने अंबाझरी तलावाच्या दिशेने निघाल्या होत्या. मेट्रो रेल्वेच्या कामातील हायड्रॉलिक क्रेनला डावीकडून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक मोपेडचा तोल गेला व तिघीही क्रेनखाली मागच्या चाकामध्ये सापडल्या. 


हा प्रकार लक्षात आल्यावर रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड केल्याने चालकाने क्रेन थांबविली. क्रेनचा चालक वाहन पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, लोकांनी पाठलाग करून त्याला पकडले व मारहाण केली. जखमी युवतींना जवळच्या वॉक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी दोघी घटनास्थळीच मृत्यूमुखी पडल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तर तिसऱ्या युवतीचा उपचारा दरम्यान काही वेळाने मृत्यू झाला. या अपघातात पोलिसांनी क्रेनचा चालक नथिनी चौहान याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. या अपघातानंतर नागपुरातील काही संघटनांनी मेट्रो रेल्वेच्या कामांच्या पद्धतीवर निदर्शने करून रोष व्यक्त केला. 


आर्थिक परिस्थिती बेताचीच 
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तिन्ही युवतींची घरची स्थिती बेताचीच आहे. स्नेहाचे वडील सुरक्षा रक्षक आहेत तर विशृतीचे वडील इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतात. ऋचिकाला आई-वडील नसल्याने तिचा सांभाळ तिची आत्या व मामाच करीत होते. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या भीषण अपघाताचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...