आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये तीन Encounter Fake! तपास समितीचा अंतिम अहवाल; 9 पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातमध्ये 2002 ते 2006 दरम्यान झालेल्या 3 चकमकी बनावटच होते. जस्टिस एच.एस. बेदी यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने या दरम्यान झालेल्या 17 प्रकरणांचा तपास केला. तसेच आपला अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करताना त्यापैकी 3 बनावट होते असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करताना त्यांनी समीर खान, कासम जाफर आणि हाजी इस्माईल या तिघांच्या एनकाउंटरचा उल्लेख केला आहे. समितीने आपल्या अहवालात या प्रकरणांमध्ये गुजरातच्या 9 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले आहेत.

 

गुजरातमध्ये 2002 ते 2006 दरम्यान झालेले अनेक एनकाउंटर वादग्रस्त ठरले. त्यापैकी 17 सर्वात कुप्रसिद्ध एनकाउंटरच्या चौकशीची जबाबदारी एका न्यायालयीन समितीकडे सोपविण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश बेदी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आपला अंतिम अहवाल गतवर्षी फेब्रवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सादर केला. आता यातील 9 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही आयपीएस अधिकाऱ्यांवर सुद्धा आरोप झाले होते. परंतु, समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली नाही. यासंदर्भात 9 जानेवारी रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गुजरात सरकारची याचिका फेटाळून लावली. त्यामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाला हा तपास अहवाल गुप्त ठेवण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टाने तो अहवाल गुप्त न ठेवता याचिकाकर्त्यांना दिला. त्यामध्ये लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...