आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये तीन जवान शहीद, स्फोटात 6 नागरिक ठार तर पाच अतिरेक्यांचा खात्मा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू/ श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी विविध ठिकाणी चकमकीत पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. राजौरी व कुलगाम जिल्ह्यांमध्ये या चकमकी झाल्या. दरम्यान, कुलगाममध्ये चकमकीनंतर झालेल्या भयंकर स्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला. तर, राजौरीत घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करताना तीन जवान शहीद झाले. 
लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळ काही अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. या वेळी लष्कराने दोन अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार केले. या वेळी अतिरेक्यांनी केलेल्या भयंकर गोळीबारात तीन जवानांनाही वीरमरण आले. एक जवान जखमी झाला आहे. घुसखोरी करणारे पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचे (बीएटी) जवानही असू शकतात. 

 

सुंदरबनी सेक्टरमध्ये ही चकमक झाली. घुसखोरांकडून दोन एके-४७ रायफलीसह स्फोटके जप्त करण्यात आली आहे. जखमी जवानास उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

नागरिक घराबाहेर येऊन थांबले आणि झाला स्फोट 
कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन अतिरेक्यांना ठार केल्यानंतर या भागात चकमक थांबली. काही नागरिक बाहेर आले. हे नागरिक उभे असताना अचानक स्फोट झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर पाच जण रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले. स्फोट कशाचा होता, हे समजू शकले नाही. नागरिकांनी बाहेर येऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. तरीही लोक घराबाहेर आले होते. 

बातम्या आणखी आहेत...