आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mob Lynching: मुलीच्या अपहरणासाठी आले होते 3 जण: जमावाकडून एकाच्या हत्येनंतर पोलिसांनी दोघांना खोलीत डांबले, लॉक तोडून घुसत त्यांचाही केला खात्मा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगूसराय - येथील सरकारी शाळेत 5 व्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या अपहरणासाठी आलेल्या 3 जणांची संतप्त जमावाने हत्या केली. जमावाच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाला तेव्हा घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी इतर दोघांना वाचवण्यासाठी त्यांना एका खोलीत बंद केले. परंतु, जमाव इतका पेटला होता की त्यांनी लॉक तोडून त्या दोघांनाही रुमच्या बाहेर काढले आणि लाठ्या-काठ्यांना ठेचून त्यांचा खून केला. मृतांमध्ये बेगुसराय जिल्ह्यातील कुभी गावातील रहिवासी असलेले मुकेश महतो, श्याम सिंह उर्फ बौना सिंह आणि कुख्यात गुंड हीरा सिंह या तिघांचा समावेश आहे. हीरा सिंह हा श्याम सिंहचा मेहुणा आहे. मुकेश जेलमध्ये बंद असलेला कुख्यात गुंड नागमणी महतोचा भाऊ आहे. तो गेल्या आठवड्यातच तुरुंगातून सुटला होता. 


नेमके काय झाले?
शाळेच्या मुख्याध्यापक नीमा देवी यांनी सांगितल्याप्रमाणे, नेहमीप्रमाणेच शनिवारी सकाळची प्रार्थना झाली आणि सर्व विद्यार्थी आप-आपल्या वर्गात जाऊन बसले. यानंतर सकाळीच 11 च्या सुमारास 3 जण एका दुचाकीवर शाळेच्या कॅम्पसमध्ये घुसले. त्यापैकी एकाने पाचवीचा वर्ग पाहून एका मुलीचा शोध सुरू केला. त्याने आपण त्या मुलीचा काका आहोत असा दावा केला. परंतु, त्याच दरम्यान मुख्याध्यापक आपल्या रुममधून बाहेर आल्या आणि त्यांनी संबंधित मुलगी शाळेत आली नाही असे त्यांना सांगितले. यावर इतर दोघांनी अचानक आत येऊन मॅडम खोटे बोलत आहेत असे तिसऱ्याला सांगितले. यानंतर आरोपी मुकेशने थेट नीमा देवी यांच्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्या मुलीची चौकशी करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान मुख्याध्यापकांनी इशाऱ्याने मुलांना बाहेर पळून जाण्यास सांगितले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांना शाळेवर घेराव टाकला.


संतप्त जमावापुढे काहीच करू शकले नाही पोलिस
- गावात संतप्त जमावाकडून कुख्यात गुंडांना मारहाण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुकेश महतोला मारहाण सुरू होती. पोलिस उपनिरीक्षक अमोद कुमार सिंह यांनी 4 होमगार्डच्या जवानांना घेऊन उर्वरीत दोन आरोपी श्याम आणि हीरा यांना शाळेच्या एका खोलीत बंद करून लॉक लावला. 
- परंतु, लोक इतके संतप्त होते की त्यांनी पोलिसांचे काहीच ऐकले नाही. लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना बाजूला करत त्या खोलीचा लॉक तोडला. त्या दोघांना बाहेर काढून त्यांनाही इतकी अमानुष मारहाण केली की त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे पोलिस हात बांधून बघ्यांची भूमिका घेण्याशिवाय दुसरे काहीच करू शकले नाही. 

 

गावकऱ्यांवर दाखल होणार हत्येचा खटला 
पोलिस अधीक्षक आदित्य कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश महतो आणि हीरा सिंहवर हत्या, चोरी, दरोडा, अपहऱण असे 8 प्रकारचे खटले होते. तर महतो सुद्धा सराइत गुन्हेगार होता. गावकऱ्यांनी त्या सर्वांचा खून केला. त्यांना मारहाण करणाऱ्या आणि दार तोडून बाहेर काढून त्यांची हत्या करणाऱ्या सर्व गावकऱ्यांच्या विरोधात खटला दाखल होणार आहे. तसेच आरोपींना अटकही केली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...