आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदर्शनावरून परतताना अपघात, देऊळगावच्या २ डॉक्टरांसह ३ ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा- आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात देवदर्शनासह सहलीवरून परत येत असताना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावच्या रहिवाशांच्या वाहनाला झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी आहेत. मृतांत दोन डॉक्टरांचा समावेश आहे. 


ही घटना कर्नाटक राज्यातील मुनिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाबळारीजवळील पुलावर सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ७ जण १५ ऑगस्ट देऊळगावहून गेले होते. तिरुपती बालाजी, उटी, म्हैसूर व इतर ठिकाणची सहल करून ते रविवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास वनाबळारीजवळील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन पुलावरील कठड्याला धडकले. पहाटेची वेळ असल्याने जखमींना वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे फैजान हाफीज मिर्झा (३२), ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सागर गवई (२४), धाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. भरत बावणे (३३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आश्विन जाधव, मोईतउल्ला मिर्झा, माजीद मिर्झा व जे. एस. लाहोटे हे गंभीर जखमी झाले 

बातम्या आणखी आहेत...