Home | National | Other State | 3 lakh 1 thousand 152 lamps at the same time in ayodhya

राम की पैडी तीन लाख दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाली:विक्रमाची गिनीज बुकात नोंद

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Nov 07, 2018, 10:14 AM IST

योगींनी दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम-जुंगसोबत केली आरती

 • 3 lakh 1 thousand 152 lamps at the same time in ayodhya

  अयोध्या - देशभरात एक आठवड्यापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. त्यांनी दिवाळीपूर्वी आनंदी वार्ता देण्याचे आश्वासन दिले होते. राम मंदिराबद्दल काहीतरी घोषणा होईल, असा अंदाज लढवला जात होता. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी योगी अयोध्येतील दीपोत्सवात कार्यक्रमात सहभागी झाले. यानिमित्ताने त्यांनी फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या असे नामकरण झाल्याची घोषणा केली. त्यांनी या शहरासाठी १७६ कोटी रुपयांच्या योजनांची भेट दिली. राम मंदिराबाबत मौन बाळगले. त्यानंतर योगींनी शरयू नदीच्या तीरावर दीपोत्सवात सहभाग घेत दीप उजळवले. आरतीही केली.

  याप्रसंगी त्यांच्यासमवेत दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई-इन यांच्या पत्नी व प्रथम महिला किम जुंग सुकही उपस्थित होत्या. शरयू नदीच्या किनारी राम की पैडीवर यंदा ३ लाख १ हजार ५२ दिवे उजळले होते. सर्वत्र लखलखाट पसरला होता. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. गतवर्षी १.७१ लाख दिवे उजळले होते.


  रामकथेवर आधारित लेझर शो-आतषबाजीही :

  योध्येत रामकथेवर आधारित लेझर शो व आतषबाजी झाली. संपूर्ण शहर रोषणाईत न्हाऊन गेले होते. परदेशी कलाकारांनी सादरीकरण केले. अयोध्येत जत्राही भरली आहे. सुरक्षेसाठी सुमारे ३५ हजार जवान तैनात होते.

  दीड वर्षात योगी सहाव्यांदा अयोध्येत
  मुख्यमंत्री योगी यांनी अयोध्येत राम, लक्ष्मण व सीतेचा राजतिलक केला. आजपासून फैजाबाद जिल्हा अयोध्या नावाने आेळखला जाईल. ही नगरी म्हणजे आमची आन, बान आणि शान यांचे प्रतिक आहे. अयोध्येची आेळख मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांमुळेच आहे. आज कोरिया प्रजासत्ताकही आपल्या उत्सवात सहभागी झाले आहे. माझ्या आधी कोणताही मुख्यमंत्री येथे आले नव्हते. मी दीड वर्षात सहा वेळा येथे आलो आहे. अयोध्येचा विकास करायचा आहे, असे योगी आदित्यानाथ यांनी याप्रसंगी सांगितले.

  १७३० मध्ये नवाब सादतने वसवली नगरी
  फैजाबाद जिल्हा मुख्यालयापासून अयोध्या १० किमी अंतरावर आहे. फैजाबादची स्थापना अवधचे पहिले नवाब सादत अली खान यांनी १७३० मध्ये केली होती. त्यांचे उत्तराधिकारी सुजा-उद-दौलाने सुमारे २६० वर्षांपूर्वी फैजाबादला अवधची राजधानी केली होती. मात्र तेथे त्यांचे अल्पकाळ वास्तव्य राहिले. त्यांनी शरयू नदीच्या तीरावर १७६४ मध्ये एक किल्ला निर्माण केला होता. १७७५ मध्ये अवधची राजधानी लखनऊला हलवली. १९ व्या शतकात फैजाबादचे पतन झाल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.

  पुढील स्लाईडवर पहा.... आणखी छायाचित्र...

 • 3 lakh 1 thousand 152 lamps at the same time in ayodhya
 • 3 lakh 1 thousand 152 lamps at the same time in ayodhya
 • 3 lakh 1 thousand 152 lamps at the same time in ayodhya

Trending