आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ३० लाख मुले होमवर्क करू शकत नाहीत; कारण जाणून व्हाल थक्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - हार्टफोर्टच्या एका शाळेत शिकणाऱ्या रिगन बायरिडसाठी दररोज रात्री होमवर्क करणे आव्हान झाले आहे, कारण तिच्या घरात कॉम्प्युटर आणि इंटरनेट नाही. त्यामुळे ती पालकांच्या स्मार्टफोनचा वापर करून आपला होमवर्क पूर्ण करते. पण तिला स्मार्टफोन रात्रीच मिळतो. लहान स्क्रीनवर ती वेब पेज उ‌लटत राहते. पण जेव्हा होमवर्क सबमिट करण्याची वेळ येते तेव्हा खूप अडचणी येतात. त्यामुळे तिला हातानेच लिहून द्यावे लागते.
रिगन अशी एकटीच विद्यार्थिनी नाही, अमेरिकेत सुमारे ३० लाख शालेय विद्यार्थी होमवर्कसाठी असाच संघर्ष करत आहेत. अमेरिकेच्या द इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सायन्सेसनुसार, १७% विद्यार्थ्यांच्या घरी पीसी नाही, तर १८% कडे इंटरनेटची सुविधा नाही. अमेरिकेच्या शिक्षण विभागानुसार, शाळेत आणि घरी तंत्रज्ञानाचे एक्सपोजर यासाठी देण्यात आले की, विद्यार्थ्यांना घरीही तसेच वातावरण मिळावे. त्यासाठी व्हर्च्युअल हायस्कूलही सुरू करण्यात आले. अनेक शाळांत ‌वेळेनंतरही नेटच्या वापराची सुविधा दिली जात आहे. पण बहुतांश विद्यार्थ्यांना हा फायदा मिळत नाही, कारण लॅपटॉप आणि टॅब्लेटसाठी शाळांना अनुदान इतर स्रोतांवर अवलंबून आहे. ते जेव्हा संपते तेव्हा उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते आव्हान ठरते.


इंग्रजीच्या शिक्षिका सुजैन जॉन्सन म्हणाल्या की, आम्हाला कागदावर असाइनमेंट द्या, असे मुले म्हणतात, पण मी तसे करत नाही. माझ्या मते, तसे केल्यास मुले तंत्रज्ञानापासून दूर जातील. भविष्यकाळ तर तंत्रज्ञानाचाच आहे.
 

७०% शिक्षक असा होमवर्क देतात, जो ऑनलाइनच पूर्ण होऊ शकतो
न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, होमवर्कचा मुद्दा यासाठी मोठा झाला आहे कारण ७०% शिक्षकांनी दिलेला होमवर्क ऑनलाइनच पूर्ण केला जाऊ शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन, पब्लिक वायफाय किंवा पार्किंगमध्ये मोफत नेटचा वापर करावा लागतो. अनेक शाळा सत्र संपल्यानंतर सुविधा देतात. सार्वजनिक वाचनालयेही होमवर्क पूर्ण करण्यास मदत करतात.