आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- ब्रिटन शुक्रवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४:३० वाजता) युरोपीय संघातून (ईयू) वेगळा झाला. अशा प्रकारे ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडणारा पहिला देश ठरला आहे. ब्रिटन युरोपीय संघाशी ४७ वर्षांपासून जोडलेला होता. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही नव्या युगाची सुरुवात असल्याचा दावा केला.
ब्रेक्झिटसंबंधी जनमत चाचणीच्या चार वर्षांनंतर ब्रिटन संघटनेतून बाहेर पडला आहे. यानिमित्ताने लंडनमध्ये हजारो ब्रेक्झिट समर्थकांनी संसदेच्या समोर एकत्र येत जल्लोष केला.संपूर्ण ब्रिटनमध्ये सुमारे ३६ लाख लोकांनी रॅली, कँडल मार्च काढले. स्कॉटलंडच्या मतदारांनी युरोपीय संघात राहण्यासाठी मतदान केले होते, परंतु संपूर्ण देशातील जनतेचे मत मात्र त्यापेक्षा भिन्न होते.
जॉन्सन म्हणाले- देशाला सोबत घेऊन मार्गक्रमण करणे ही माझी जबाबदारी
ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी सोशल मीडियावर संदेश दिला. खूप लोकांसाठी हा आशेचा मोठा क्षण आहे. कारण आतापर्यंत हे घडेल असे त्यांना कधी वाटत नव्हते. खूप लोकांना आपली हानी झाल्यासारखे वाटत आहे. काहींना राजकीय अडथळे कधी संपतील की नाही असे वाटते. मी सर्वांच्या भावनांना समजू शकतो, परंतु सरकार म्हणून निश्चितपणे माझी एक जबाबदारी आहे. देशाला सोबत घेऊन मार्गक्रमण करेल.
ईयूच्या संस्थांवरील ब्रिटनचे ध्वज हटवले, १० डाउनिंग स्ट्रिटला सजवले
लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरवर अलोट गर्दी झाली होती, नागरिकांनी देशभक्तिपर गीत गायले, भाषणेही झाली.
ब्रिटनचे पंतप्रधान कार्यालय व निवास १० डाउनिंग स्ट्रिट राेषणाईने न्हाहला. शेकडो कार्यक्रम साजरे झाले.
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये युरोपीय संघाच्या संस्थांवरील ब्रिटनचा ध्वज हटवण्यात आला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.