आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षे मुलबाळ झाले नाही म्हणून घरी घेऊन आला दुसरी महिला, तिलाही काही झाले नाही म्हणून रचला हा कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगरूर (पंजाब) - 6 दिवसांपूर्वी घरांचो गावातून तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीसहीत इतर दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन महिलांमध्ये एक आरोपीची पत्नी आहे तर दुसरी आरोपीसोबत रिलेशनमध्ये राहते. आरोपीने अपहरण केलेल्या बाळालाही सुखरूप त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला मुलबाळ होत नसल्यामुळे पत्नीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बाळाचे अपहरण केले होते.


आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी केली होती अशी प्लॅनिंग 
एसएसपी डॉ. संदीप गर्ग यांच्यानुसार या घटनेनंतर बाळाच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम करण्यात आल्या. या टीमने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल, टॉवर लोकेशन आणि सोशल मीडियावर आरोपीची गाडी आणि त्यांचे स्केच काढून घेतले. या संयुक्त ऑपरेशननंतर पोलिसांनी मंगळवारी एक संशयित कार गाव लड्डापासून बेनाडा गावाकडे जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच नाकाबंदी करून बाळाचे अपहरण करणारा मुख्य आरोपी कुलदीप खान उर्फ मनी, त्याची पत्नी गुर्मीत कौर, मनजीत कौर यांना अटक केली. आरोपींकडे बाळही होते. आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कारवरचा नंबरही डुप्लिकेट आहे. आरोपी आपल्या ओळखीच्या घरातून कारचे कागदपत्र चोरून घेऊन आला होता, यांचा वापर या कारसाठी केला गेला.


10 ऑक्टोबरला झाले होते शिवजोतचे अपहरण 
कुलदीप खान उर्फ मनी राहणार रतिया याचे 5 वर्षांपूर्वी गुरमीत कौरसोबत लग्न झाले होते. परंतु यांना अपत्य न झाल्यामुळे कुपदीपने मनजीत कौरला आपल्या घरी ठेवले. परंतु तिलाही अपत्य झाले नाही. यानंतर कुलदीप खानने बाळ चोरी करण्याचा कट रचला. कुलदीपचा घरोंचाजवळ बटरीयानामध्ये एक नातेवाईक होता, ज्याच्याकडे त्याचे येणे-जाणे होते. कुलदीप खान घरोंचा येथील विविध लोकांना ओळखत होता. त्याला समजले की, घरांचो येथील मलकीत सिंह यांच्या घरी एक बाळ जन्माला आले आहे. 10 ऑक्टोबरला कुलदीप खान तीन महिन्यांचे बाळ शिवजोत सिंहचे आजोबा अजायब सिंह यांच्याकडे गेला आणि आपण दूरचे नातेवाईक असल्याचे सांगून घरात प्रवेश केला. आजोबांना बोलण्यात गुंतवून बाळाला खेळणी देण्याच्या बहाण्याने अपहरण केले. त्यानंतर तो आपल्या रतिया गावाकडे आला. कुटुंबियांना त्याने बाळ दत्तक घेतल्याचे सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...