आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा शहरात भीषण आगीत ३ दुकाने खाक; सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा । येथील गावहोळी चौक परिसरातील शिरसमणीकर ज्वेलर्ससह तीन दुकानांना बुधवारी  पहाटे ६ वाजता शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत एक कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १९ मार्च रोजी रात्री ९ वाजता शिरसमणीकर ज्वेलर्स, सुनील ड्रेसेस, सरसवान किराणा यांनी दुकान बंद केले. बुधवारी सकाळी सहा वाजता किराणा दुकानाचे मालक रमेश अमृतकर यांना ज्वेलर्सच्या दुकानातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी ज्वेलर्सचे मालक सुनील भालेराव यांना माहिती दिली. दुकानाचे शटर उघडले असता प्रचंड मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ  अंगावर येत असल्याचे पाहून आम्ही सर्व जण घाबरून बाहेर पडलो, असे भालेराव यांनी सांगितले. गेल्या महिन्यात ज्वेलर्स दुकानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यात १२ लाख रुपये खर्चाचे फर्निचर, एसी आगीत जळून खाक झाले. दुकानातील काही सोन्या-चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, कर्जाची फाइल, बँक पासबुक असा एकूण ३५ ते ४० लाखांचा ऐवज खाक झाला.

 

 

इतर दोन दुकानांचेही नुकसान 

इतर दोन दुकानांचे मिळून १ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आगीचे माहिती मिळाल्यानंतर नररपालिका आणि परिसारातील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळानंतर जवानांनी ही आग आटोक्यात  आणली. दरम्यान, बुधवारी येथील काही दुकाने बंदच  होती.

बातम्या आणखी आहेत...