आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Soldiers Killed In Tangdhar, One Missing In Gurez Sector After Being Hit By Avalanche In Kashmir

तंगधार आणि गुरेज सेक्टरमध्ये आर्मी पोस्टजवळ हिमस्खलन; 3 जवान शहीद, 1 बेपत्ता

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरात नियंत्रण रेषेजवळ हिमस्खलनाच्या दोन वेग-वेगळ्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये 4 जवान अडकले होते. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 3 जवान शहीद झाले. तर दुसरीकडे, बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये एक जवान बेपत्ता झाला आहे. गेल्या महिन्यात सियाचीन एवलांच (हिमस्खलनात) 6 जवान शहीद झाले होते. हिवाळ्यात काश्मीर आणि लडाखमध्ये बर्फातून दुर्घटनांचा धोका असतो.


30 नोव्हेंबर रोजी लडाखच्या दक्षिण सियाचिन ग्लेशियरमध्ये 18 हजार फुट उंचीवर कार्यरत लष्कराचे गस्ती दल हिमस्खलनात अडकले होते. बचाव पथकाने अनेक जवानांना त्यातून सुखरूप बाहेर देखील काढले. परंतु, उपचार सुरू असताना नायब सुभेदार सेवांग ग्यालशन आणि रायफलमन पदम नोरगॅस यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी 19 नोव्हेंबर रोजी उत्तर सियाचिनमध्ये ग्लेशियरजवळ हिमस्खलन झाले. यात 4 जवान शहीद झाले होते. तसेच दोन सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला. जवळपास 20 हजार फुट उंचीवर असलेले सियाचिन जगातील सर्वात उंच युद्धभूमी असून तो लडाखचा भाग आहे.

बातम्या आणखी आहेत...