नवी दिल्ली - भारतरत्न आणि तीन वेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी 5.05 वाजता निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. अटलजींच्या एका चाहत्याने त्यांचे तीन किस्से त्यांच्याच आवाजात ऐकवत त्यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अटलजी दोन महिने AIIMS मध्ये अॅडमिट होते. पण गेल्या 36 तासांत त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. त्यापूर्वी सुमारे 9 वर्षांपासून ते आजारी होते. ते कोणाशी बोलत नव्हते, स्मृतीभ्रंश झाला होता. ज्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांचे कान उत्सुक असायचे त्याच सरस्वतीच्या पुत्राने मौन पत्करले होते. त्यांच्या जीवनातील तीन खास किस्से त्यांच्याचस अंदाजात आपण ऐकणार आहोत.