आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात गणपती विसर्जनादरम्‍यान 3 शाळकरी विद्यार्थी तलावात बुडाले, इंद्रायणीत बुडून एकाचा मृत्‍यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गणेश विसर्जनादरम्‍यान तलावात बूडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. आज (रविवारी) सायंकाळी साडेपाच वाजता जुन्नरजवळील पिंपरी कावळ या गावात ही घटना घडली.
 सुमित सावकार पाबळे(11), वैभव विलास पाबळे (11) आणि गणेश नारायण चक्कर (9) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत.


या घटनेने पिंपरी कावळ गावावर शोककळा पसरली आहे. आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या दुर्घटनेत पाण्यात बुडालेल्या एका मुलाचा जीव वाचविण्यात यश आले आहे. ओंकार एकनाथ चक्कर (वय 8) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर आवारे हॉस्पिटल आळेफाटा येथे उपचार सुरु आहेत.


इंद्रायणीत बुडून एकाचा मृत्‍यू
देहुमध्‍ये विर्सजनादरम्यान इंद्रायणी नदीत पउल्‍याने 19 वर्षीय तरूणाला जीव गमवावा लागला आहे.  तब्‍बल 3 तासाच्‍या शोधमोहिमेनंतर NDRFच्या जवानांनी या तरूणाला इंद्रायणीतून बाहेर काढले होते. बाहेर काढले तेव्‍हा तरूण जिवंत होता, अशी माहिती आहे.  त्‍याला उपचारासाठी तात्‍काळ YCM रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. मात्र उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. संदिप सांळूखे असे या तरूणाचे नाव आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...