आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरकवड्यात १५ फूट खड्ड्यातील पाण्यात बुडून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांढरकवडा- वसतिगृह बांधकामाच्या सिमेंट काँक्रिटिंगसाठी तात्पुरत्या खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ िजल्ह्यातील पांढरकवडा शहरातील राधाकृष्णनगर येथे रविवारी उघडकीस आली. आदेश बाळासाहेब राठोड,  संचेतन श्यामकिरण राठोड आणि सिद्धेश विकास मोगरकर (सर्व  रा. पांढरकवडा) अशी मृतांची नावे आहेत.  


शहरात राधाकृष्णनगरात गेल्या काही महिन्यांपासून समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी  तात्पुरता सिमेंट काँक्रिटिंग तयार करण्यासाठी १० ते १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.  यादरम्यान पावसाच्या पाण्यामुळे तो खड्डा पूर्णपणे भरला होता. रविवारी तिघेही खड्ड्याजवळून जात होते. मात्र, तो खड्डा किती खोल असेल याचा अंदाज न आल्याने तिघे त्यात बुडाले. मुले घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्या वेळी या खड्ड्यात एक मुलाची सायकल आढळल्याने नागरिकांना संशय निर्माण झाला. यापैकी काही नागरिकांनी या खड्ड्यात उतरून तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची  मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...