आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन सुपरमून, चंद्रग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती - नवीन वर्ष खगोलअभ्यासकांसाठी विविध खगोलिय घटनांची रेलचेल घेऊन आले आहे. यात तीन सुपरमुन, चंद्रग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहणासह चार ग्रह पृथ्वीनजीक येणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमीसाठी हे वर्ष मेजवानीचे ठरणार आहे. 


अंतराळात दररोज असंख्य घडामाडी घडत असतात. या प्रत्येक घडामोडीला खगोलशास्त्रात महत्त्व असते. नवीन वर्षात २१ जानेवारीला सुपरमून दिसणा आहे. चालू वर्षात तीन वेळा सुपरमुन दिसणार असून, या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सर्वात जवळ राहणार आहे. त्यामुळे चंद्र मोठा व अधिक प्रकाशमान दिसणार आहे. १९ फेब्रुवारीला दुसरा सुपरमुन दिसेल. २७ फेब्रुवारीला सायंकाळी सुर्य मावळल्यानंतर पश्चिम आकाशात बुध ग्रह दिसणार आहे. 

 

२० मार्च रोजी जगभर दिवस व रात्र सारखाच राहणार आहे. या दिवसाला आपल्या देशात वसंत संपाद दिन असे म्हणतात. २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिवस असून ६ व ७ मे रोजी उल्का वर्षाव होणार आहे. हा वर्षाव कुंभ तारका समूहासमोर होईळ. १० जूनरोजी गुरु-पृथ्वी जवळ येईल. हे दृश्य टेलिस्कोपमधून पाहता येणार आहे. २१ जून रोजी दिवस सर्वात मोठा १३ तास १३ मिनिटाचा राहणार आहे. 

 

२ जुलै रोजी खग्रास सूर्यग्रहण असून, भारतात मात्र ते दिसणार नाही. ९ जुलै रोजी शनी पृथ्वीच्या सर्वाँत नजीक राहील. हे दृश्यरिंग टेलिस्कोपमधून पाहता येणार आहे. १६ जुलै रोजी खंडग्रास चंद्रग्रहण असून, आपल्या देशातून ग्रहण पाहता येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी नेपच्युन हा पृथ्वीजवळ राहील. 

 

२३ सप्टेंबर रोजी दिवस व रात्र सारखीच राहणार आहे. २७ ऑक्टोबर रोजी युरेनस हा ग्रह पृथ्वीच्या नजीक राहणार आहे. १७ व १८ नोव्हेंबर रोजी सिंह तारकासमुहातून उल्का वर्षाव होईल. 

 

२२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस राहणार असून कालावधी १० तास ४७ मिनिटाचा राहिल. २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण असून, ते दक्षिण भारतातून दिसणार असल्याची माहिती हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी दिली. 
 

बातम्या आणखी आहेत...