आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, रक्ताच्या थारोळ्यात टाकून फरार झाला आरोपी, डॉक्टर म्हणाले- जखमा इतक्या गंभीर आहेत की, 12 ते 14 टाके द्यावे लागतील...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत(गुजरात)- हजीरामध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चिमुकलीला सिव्हील हॉस्पीटल भर्ती करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी बलात्कार झाल्याचे सांगितले. 50 पेक्षा जास्ती पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत आणि परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सध्या गंभीर अवस्थेतील चिमुकलीला रूग्णालयात घेऊन आलेल्या युवकाची चौकशी करण्यात येत आहे, पण आरोपी मात्र फरार आहेत.


चिमुलीच्या आईने सांगितले की, अंदाजे तीन वाजता चिमुकली बाहेर खेळण्यासाठी गेली होती. खुप वेळा झाला तरी ती घराप परत आली नाही त्यामुळे घरचे तिला शोधण्यासाठी गेले, पण तिचा काही शोध लागला नाही. त्यानंतर अंदाजे 6 वाजता एका 19 वर्षीय युवकाने रक्ताच्या थारोळ्यातील चिमुकलीला घरी आणले. तो युवक त्याच कॉलनीत राहतो, त्याला मुलगी घरापासून 500 मीटर अंतरावर एका झाडात पडलेली मिळाली. चिमुकलीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, 2 ते 3 सेंटीमीटरच्या जखमा होत्या त्यावर 12 ते 14 टाके लावावे लागतील.


प्रायव्हेट पार्टमध्ये जखमा, कपडेही रक्ताने भरले 
सिव्हील हॉस्पीटलचे सीएमओ डॉक्टर मंडल यांनी सांगितले की, चेकअप केल्यावर कळाले की, मुलीच्या गुप्तांगात इंजूरी झाली आहे. त्यासोबत ब्लीडिंग होत होती आणि त्यात स्पर्म मिळाले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी आणि सँपल कलेक्शनसाठी गायनॅक विभागात रेफर केले. सध्या गायनॅक विभागात मुलीच्या सँपलची तपसणी केली आणि त्यात कळाले की, मुलीवर बलात्कार झाला आहे.

 

पोलिसांनी सुरू केली आरोपीची शोधा-शोध 
हजीरा पोलिस ठाण्याचे पीएसआय आर.आर. अहीर यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी हजीरा, रांदेर, इच्छापोर आणि अडाजणच्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. यात एसओजी, क्राइम ब्रँच, पीसीबी आणि हजीरा पोलिसांच्या 50 जवान आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासोबतच आसपासचे सगळे सीसीटीव्ही फूटजही पाहिले जात आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...