आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव ईर्टिगा कारची चिमुकलीला धडक, कारचे चाक डोक्यावरून गेल्याने रस्त्यावर विखुरला मेंदू

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • वाहनधारक व वाहनातील लोकांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा लोकांनी घेतला होता पवित्रा
  • पोलिसांनी पसार वाहनचालकाच्या मुसक्या आवळल्या

नांदेड - नांदेडहून हिमायतनागरकडे येणाऱ्या एका भरधाव कारने बालवाडीतील चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास किनवट-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील सरसम, इंदिरा नगर आबादीजवळ घडली. अर्पिता सीताराम गुंडेकर (वय ३ वर्षे)  असे मृत बालिकेचे नाव आहे. अपघातानंतर नागरिकांनी वाहनधारकासह गाडीतील लोकांवर गुन्हे दाखल करून तात्काळ या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते.

सकाळी ११ वाजेच्या सुमाराला बालवाडीत शिकणारी अर्पिता  ही रस्त्याच्या पलीकडील साई मंदिराकडून राष्ट्रीय महामार्ग पार करून घराकडे येत होती. या वेळी नांदेडहून भरधाव आलेल्या ईर्टिगा कारने (क्र. एमएच १४ डीएक्स ७७३३) तिला उडवले. ती चाकाखाली पडली. त्यानंतर चालकाने कार रिव्हर्स घेऊन धूम ठोकली असता चाक पुन्हा बालिकेच्या डोक्यावरून गेल्याने तिचा मेंदू विखुरला गेला. जोपर्यंत वाहनधारक व वाहनातील लोकांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत जोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने ३ वाजता उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, हदगावचे तहसीलदार जीवराज दापकेकर, तहसीलदार जाधव, नायब तहसीलदार अनिल तामस्कर, पो. नि. भगवान कांबळे घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रस्ता रोखून धरत आपला रोष व्यक्त केला.पोलिसांनी पसार वाहनचालकाच्या मुसक्या आवळल्या 

या घटनेनं संतप्त झालेल्या इंदिरानगरमधील नागरिकांनी रस्त्यावर येऊन रास्ता रोको करत प्रशासन व ठेकेदाराच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र निषेध केला. घटना  घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी येथून पसार झालेल्या वाहनधारकाला ताब्यात घेऊन वाहन पोलिस ठाण्यात आणले.