आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंग्‍या चावत आहे, असे म्‍हणून रडू लागली 3 वर्षांची चिमुरडी; आई म्‍हणाली- राक्षसाने फुलासारख्‍या माझ्या मुलीचे काय हाल केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - शहरातील 24 वर्षीय तरूणाने 3 वर्षांच्‍या चिमुरडीचे अपहरण करून तिच्‍यावर अत्‍याचार केले. आरोपीने घरात खेळणा-या चिमुरडीचे अपहरण केले व नंतर तिला 100 मीटर दूर आपल्‍या घरी नेऊन घराच्‍या छतावर तिच्‍यावर अत्‍याचार केले. पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. त्‍याच्‍यावर अपहरण आणि पॉक्‍सो अॅक्‍टअंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. सूरतमध्‍ये मागील 4 दिवसांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

 

चिमुरडीच्‍या वडीलांचा मित्र होता आरोपी
- आरोपी महेंद्र उर्फ मंगल सिंह हा मुलीच्‍या वडीलांसोबत एका कारख्‍यान्‍यात कामाला होता.
- एफआयआरअनूसार, सोमवारी संध्‍याकाळी 7 वाजता आरोपी महेंद्र मुलीच्‍या वडीलांना भेटायला त्‍यांच्‍या घरी गेला. वडील मात्र यावेळी बाहेर गेले होते. चिमुकली खोलीत खेळत होती. नंतर आरोपीशी गप्‍पा मारून आईदेखील स्‍वयंपाकाच्‍या तयारीला लागली. काही वेळाने आरोपी चिमुरडीला बाहेर खायला घेऊन जातो म्‍हणून बाहेर निघाला. यावेळी आईने त्‍याला रोखलेदेखील. मात्र तो थांबला नाही व चिमुरडीला घेऊन घराबाहेर पडला. नंतर रात्री 9 वाजता तो पुन्‍हा घरी आला.


मुलीच्‍या वडीलांसोबत दारू पिली, त्‍याच्‍याच घराच्‍या छतावर रेप केला, आरोपीचा दावा
- मंगळवारी रात्री आरोपी महें‍द्र सिंहला मेडीकल चाचणीसाठी सिव्‍हील हॉस्पिटलमध्‍ये नेण्‍यात आले. त्‍यानंतर पोलिसांनी त्‍याची चौकशी केली असता त्‍याने सांगितले की, मी माझ्या घरी नव्‍हे तर मुलीच्‍या वडीलांच्‍या घरी, त्‍यांच्‍या छतावरच मुलीसोबत दुष्‍कर्म केले. त्‍या रात्री मुलीचे वडील व मी सोबत दारू पिलो. नंतर गच्‍चीवर झोपायला गेलो व तेथेच मुलीसोबत दुष्‍कर्म केले.

 

पित्‍याने दावा फेटाळला; म्‍हणाले, स्‍वत:च्‍या घरी घेऊन गेला होता आरोपी
महेंद्र रात्री 9 वाजता माझ्या मुलीला घेऊन घराबाहेर पडला होता. मी घरी आल्‍यावर मुलीच्‍या शोधासाठी बाहेर निघालो तेव्‍हा रस्‍त्‍यातील एका ओळखीच्‍या व्‍यक्‍तीने सांगितले की, तो मुलीला घेऊन त्‍याच्‍या घरी जाताना दिसला. महेंद्रच्‍या घरी गेल्‍यावर त्‍याचा भाऊ बाहेर बसलेला मला दिसला. त्‍याला विचारल्‍यावर त्‍याला आपला भाऊ कोठे आहे, याबाबत काहीही माहिती नसल्‍याचे त्‍याने सांगितले. त्‍यामुळे मी तेथेच बसलो. थोड्याच वेळाने मुलीचा रडण्‍याचा आवाज मला ऐकू आला. मी तिला उचलताच माझा हाथ रक्‍ताने भरला. तसेच महेंद्रदेखील अंधारात घराच्‍या मागे धावताना दिसला. मी ताबडतोब याची सुचना आम्‍ही काम करतो त्‍या कारखान्‍याच्‍या मालकाला दिली. नंतर त्‍यानेच फोन करून महेंद्रला तेथे बोलावले. तो परताच माझ्या पत्‍नीने त्‍याला चप्‍पलने मारायला सुरूवात केली. मीही त्‍याचा गळा पकडला होता. मात्र मालकाने आम्‍हाल रोखले व पोलिसांना फोन लावण्‍यास सांगितले.

 

 

 

 

    

 

बातम्या आणखी आहेत...