आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 year old Runner Mann Kaur, Who Ran On The Platform To Receive The Nari Shakti Award, Also Showed The President The Dance; Award For 2 Women

नारीशक्ती पुरस्कार घेण्यास व्यासपीठावर धावत आल्या १०४ वर्षीय धावपटू मान कौर, राष्ट्रपतींना नृत्यकलाही दाखवली; १६ महिलांना पुरस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान कौर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षीय मुलासोबत धावायला सुरुवात केली होती

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी महिलादिनी देशातील १६ महिलांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान केले. हा महिलांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. या समारंभादरम्यान १०४ वर्षीय अॅथलिट मान कौर यांचा प्रवेश होताच व्यासपीठ आणि संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. मान कौर व्यासपीठावर धावतच आल्या. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींच्या विनंतीवरून त्यांनी नृत्यही सादर केले. मान कौर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षीय मुलासोबत धावायला सुरुवात केली होती. १०० वर्षांवरील वयोगटात त्यांनी जगभर ३० हून अधिक सुवर्णपदके पटकावली.बातम्या आणखी आहेत...