आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टवेअर इंजीनिअर पत्नीने प्रोफेसर पतीला तुरूंगात पाठवून दिला घटस्फोट, आता 3 वर्षानंतर म्हणाली- खुप मोठी चुक केली, आता परत त्याच्यासोबत राहायचे आहे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- घटस्फोटाच्या 3 वर्षानंतर माहिलेचे मन बदलले आणि तिने पतीसोबत राहण्यासाठीचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला दिला. प्राधिकरणने या प्रकरणात काउंसलिंग करण्यासाठी पतीला बोलवले. काउंसलिंगच्या पूर्वी पतीने पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. पतीचे म्हणने आहे की, पत्नीमुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तरूंगात जावे लागले होते. यामुळे आर्थिक आणि मानसीक छळ झाला. पतीने दुसरे लग्न केलेल नाहीये त्यामुळे त्यांच्यात काउंसिलींग करून त्यांच्या लग्नाचे प्रयत्न केले जात आहेत.


आई, भाऊ आणि बहिणीने दिला त्रास
अयोध्या नगर निवासी महिलने अर्जात सांगितले, 14 फेब्रुवारी 2012 तिचे लग्न एका खासगी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्रोफेसरसोबत झाले. जानेवारी- 2016 मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांची सत्यता कळाली. कुटुंबीय पतीकडून मिळालेले पैसे हडप करत होते. आई, भाऊ आणि बहिणीने तिचे आयुष्य उद्धवस्त केले. तिच्याकडून खुप मोठी चुक झाली आहे आणि तिला तिच्या पतीकडे जाऊन ती चुक सुधारायची आहे. काउंसलरला महिलेने सांगितले की, ती सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. तिने आरोप लावला आहे की, माहेरच्या लोकांनी आमच्या दोघातील वाद मिटवण्याऐवजी वाद वाढवला आणि त्यामुळेच घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर महिला डिप्रेशनमध्ये गेली होती, आणि त्यामुळे तिची नोकरीदेखील सुटली. तिने तिचे आयुष्य कुटुंबीयांना दिले, आणि कमवलेला सगळा पैसा भावाच्या लग्नात लावला. पण लग्नानंतर सगळ्यांची वागणुक बदलली.  तिच्या आईनेही तिची साथ सोडून दिली आणि रोज तिला टोमने मारू लागली, आणि अंत तेव्हा झाला जेव्हा भावाने तिला मारहाण करून घरातून बाहेक काढले. तेव्हा तिली तिची चुक कळाली आणि तिने तिच्या पतीकडे जाण्याचे ठरवले.

 

पतीने पुन्हा लग्न करण्यास नकार दिला
काउंसलर नुरुनिसा यांनी सांगितले की, पतीने पुन्हा महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याचे म्हणने आहे की, पत्नीने केस दाखल केली होती, त्यामुळे समाजात खुप अपमान झाला त्यामुले मला तिच्यासोबत लग्न करायचे नाहीये. पण काउंसीलरचे म्हणने आहे की, पतीने दुसरे लग्न केलेले नाहीये त्यामुळे पुन्हा लग्न करण्याची संधी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...