आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६ वर्षांच्या साराने डोळ्यावर पट्टी बांधून २ मिनिटे ७ सेकंदात सोडवले रुबिक

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
रुबिक क्यूब सोडवताना सारा. - Divya Marathi
रुबिक क्यूब सोडवताना सारा.

चेन्नई - चेन्नईतील ६ वर्षाच्या मुलीने तामिळनाडू क्यूब असोिसएशनने जगातील सर्वात छोटी जीनियस असा पुरस्कार देण्यात आला. साराने डोळ्यावर पट्टी बांधून कविता म्हणत २ मिनिटे ७ सेकंदात २X७ रुबिक क्यूब कोडे सोडवले आहे. साराच्या या यशाची  नोंद गिनिज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. सारा वेल्लामल शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकते. साराने अवघ्या ४ महिन्यापूर्वी रुबिक क्यूब खेळण्यास सुरूवात केली. शिक्षकांनी सांगितले, साराचा बुध्यांक  तिच्या वयातील मुलींपेक्षाही खूप जास्त आहे. साराला हे कोडे सोडवल्याबद्दल आतापर्यंत ५ अवॉर्ड मिळालेले आहेत. कोडे सोडवण्याबरोबरच साराला कविता वाचण्याचीही खूप आवड आहे. यापूर्वी २० मे २०१९ रोजी २० वर्षांच्या तरुणाने पाण्यात रुबिक क्यूबचे कोडे सोडवून आपले नाव गिनिज बुकात नोंदवले होते. मुंबईचा जलतरणपटू चिन्मय प्रभू याने ९ खंडाचा गुुंता ४८ सेकंदात सोडवले आहे. गेल्या वर्षी गिनिज बुकात त्याचे नाव पाठवण्यात आले. परंतु यावर्षी त्याच्या नावाची नोंद िगनिज बुकात करण्यात आली. बातम्या आणखी आहेत...