आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

सोमवार, 30 डिसेंबरला 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

  • वृषभ: शुभ रंग : अबोली | अंक : १

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील. 

  • मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळणार अहे. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यंना उपासनेचे फळ मिळेल. काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल.

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा. 

  • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ७

आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

  • कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

  • तूळ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.

  • वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे घात करतील. 

  • धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ३

नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.ज्येष्ठ मंडळी  तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही. 

  • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.

  • कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : २

तुमच्या वागण्यात इरांना हट्टीपणा जाणवेल. स्वत:चेच  खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील. 

  • मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. 

बातम्या आणखी आहेत...