आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट एअरवेजच्या विमानात ३० प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त आले; ५ जण कर्णबधिर, डोकेदुखीच्या तक्रारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली- मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात गुरुवारी खळबळजनक प्रकार घडला. सुमारे ३० प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले. पाच जणांना ऐकूच येईना. अनेकांनी डोकेदुखीची तक्रार केली.


सूत्रांनुसार, विमानातील क्रूंच्या बेजबाबदारपणामुळे केबिनमध्ये हवेचा दाब नियंत्रित करणारे बटण (ब्लीड स्वीच) चालू करावयाचे राहून गेले. यामुळे विमानात हवेचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन मास्क बाहेर आले. विमानात १६६ प्रवासी आणि ५ क्रू होते. नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हा प्रकार पायटलच्या बेजबाबदारपणामुळे घडला असावा, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. उड्डाणापूर्वी केबिनचे प्रेशर कंट्रोल तपासणे त्याचीच जबाबदारी होती. शेवटी २३ मिनिटांनी विमान पुन्हा मुंबईत उतरवण्यात आले. 


पाच प्रवाशांना अचानक ऐकूच येईना...
विमानातील पाच प्रवाशांना ऐकूच येत नव्हते. त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. रुग्णालयाचे अधिकारी राजेंद्र पाटणकर म्हणाले, हवेचा दाब कमी झाल्यामुळे कानावर हा परिणाम झाला.


प्रवासी म्हणाले, अचानक हवेचा दाब कमी झाला
मुंबईचे प्रशांत शर्मा म्हणाले, केबिनमध्ये अचानक हवेचा दाब कमी झाला. ऑक्सिजन मास्क उघडले गेले. प्रवाशांच्या नाकातून रक्त आले. अनेकांना कानात वेदना सुरू झाल्या. विमानातील जयपूरचे प्रवासी दर्शक हाती यांनी घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. 


आकाशातील ‘ती’ थरारक २३ मिनिटे...
>सकाळी ५.५२ वाजता प्रवासी विमानात बसले आणि गेट बंद झाले.
>सकाळी ५.५८ वाजता विमानाने मुंबईत विमानतळावरून पार्किंग सोडली.
>सकाळी ६.१२ वाजता विमान एअरबॉर्न झाले, अनेकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास.
>सकाळी ६.२० वाजता विमान ११ हजार फूट उंचीवर, प्रवासी बिथरले, केबिन क्रू सतर्क.
>सकाळी ६.२८ वाजता पायलटने विमान मुंबईकडे वळवले, ऑक्सिजन मास्क खाली आले, प्रवाशांनी ते लावले.
>सकाळी ६.५८ वाजता विमान लँड झाले.
>सकाळी ७.०३ वाजता प्रवासी उतरले.

पुढे पाहा, संबंधित PHOTOS

बातम्या आणखी आहेत...