Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | 30 percent women vote under pressure from husband suggests research by dr barde

लोकसभा निवडणूक 2019: अजूनही 30 टक्के शेतमजूर महिला करतात पतीच्या दबावाखाली मतदान

प्रतिनिधी | Update - Apr 23, 2019, 01:38 PM IST

समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदलाल भीमराव बर्डे यांच्या संशोधनाचा निष्कर्ष

  • 30 percent women vote under pressure from husband suggests research by dr barde

    औरंगाबाद - कौटुंबिक निर्णय असो वा महत्त्वाच्या इतर विषयात भूमिका घ्यायची असेल. महिलांचे मत कितपत गृहित धरले जाते. विशेषत: ग्रामीण भागातील हे चित्र फारसे बदललेले नाही. एवढेच नाही तर पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदात्यांची संख्या देखील आहे. असे असतांना देखील मात्र आजही पतीच्या दबावाखाली करण्यात येणाऱ्या मतदानाचे प्रमाण ३० टक्के महिलांमध्ये आहे. ज्या शेतावर त्या काम करतात त्या मालकांच्या दबावाचे १६ टक्के तर स्थानिक पुढाऱ्यांचा दबाव हा २२ टक्के असल्याचे निष्कर्षणातून समोर आले आहे.

    गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथील नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील समाजशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. नंदलाल भीमराव बर्डे यांनी हे निष्कर्ष नोंदवला आहे. या संदर्भातील प्रबंध त्यांनी विद्यापीठात सादर केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 9 तालुके आणि त्यातील प्रत्येकी पाच गावे यात आहेत. तसेच अशा 45 गावांमधील भूमिहिन शेतमजूर महिलांचा केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. मतदानासाठी कोणाचा दबाव येतो, या प्रश्नावर 30 टक्के महिलांनी पतीचा, असे उत्तर नोंदवले आहे. राजकारणात महिलांचा सहभाग असावा, असे 84 टक्के महिलांनी मत नोंदवले आहे. मात्र प्रत्यक्षात तुम्हाला राजकारणात यायला अवडेल का? या प्रश्नावर तेथील अपमान सहन न होणारा असतो, जवळ पैसा नाही किंवा राजकारणाची आवड नाही, असे बहुतांश महिलांचे मत आहे. राजकारणाची बरीच माहिती शेतमजूर महिलांना असते. ही माहिती कुठून मिळते, याचा अभ्यास केला असता ती दूरचित्रवाणी 20 टक्के, रेडिओवरुन 32 टक्के मिळण्याचे प्रमाण आहे, असे बर्डे यांनी सांगितले.

Trending