आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृहांतील 30 हजारांवर मुलांचे आधार क्रमांक ट्रॅक चाइल्ड पोर्टलसोबत लिंक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात बालगृहांत राहत असलेल्या ३० हजारांवर मुलांचे आधार क्रमांक ट्रॅक चाइल्ड पोर्टलशी लिंक करण्यात आले आहेत. या माध्यमातून बेपत्ता मुलांना शोधून काढण्यास मदत होणार आहे.


ट्रॅक चाइल्ड पोर्टल देशातील विविध भागांतून बेपत्ता मुलांचा केंद्रीय डाटाबेस म्हणून काम करते. त्यांना शोधण्यासाठी हे पाेर्टल बालगृह, पोलिसांचे विभाग आणि राज्य सरकारांतील समन्वयाचेही काम करते. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बालगृहांत राहणाऱ्या मुलांची संख्या माहिती व्हावी म्हणून त्यांचे आधार क्रमांक या पोर्टलशी लिंक केले जात आहेत. आतापर्यंत ३०,८३५ मुलांचे आधार क्रमांक लिंक करण्यात आले आहेत.


९००० बालगृहे, २.६० लाख मुले
देशभरात ९ हजारांपेक्षा जास्त बालगृहे आहेत. त्यात २ लाख ६१,५६६ मुले राहत आहेत. एखाद्या बेपत्ता मुलास बालगृहात दाखल करण्याचा प्रयत्न केल्यास आधार क्रमांकाद्वारे त्याची सर्व माहिती उपलब्ध होईल. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक बालगृहांतील मुले गायब झाल्याच्या बातम्या येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...