आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात 30 हजार रस्ते अपघात, 13 हजार मृत्यू, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील विविध भागांमध्ये मागील वर्षभराच्या काळात सुमारे ३० हजार रस्ते अपघात झाले. त्यात १३ हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी सुमारे ८० टक्के लोकांच्या मृत्यूमागे मानवी चूकच कारणीभूत ठरल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी सांगितले. ते परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारीदरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची व त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. माध्यमांनीही या मोहिमेला 'सक्ती' असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. 


विनाअपघात सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव 
३० वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालकांचा रावते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात वाहनचालक किरण पोतदार (महाड आगार), अशोक भोसले (मुंबई सेंट्रल आगार), गोपीनाथ वाकळे (संगमनेर आगार), विजयकुमार स्वामी (सोलापूर आगार), आनंदराव सोनकर (ठाणे २ आगार) यांचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...