Home | Maharashtra | Mumbai | 30 to 35 go down took fire in thane

ठाण्यातील डोसिया कम्पाऊंडरमधील 30 ते 35 गोडाऊनला आग, कोणीतरी आग लावली असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 08:07 PM IST

केमिकल आणि कापडाचे गोडाऊन मोठ्या प्रमाणात असल्याने आग वाढल्याचे सांगितले जात आहे

  • 30 to 35 go down took fire in thane

    ठाणे- ठाण्याततील 30 ते 35 भंगार गोडाऊनला आग लागल्याची घटना आज घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ठाण्यातील शीळ डायघर भागातील डोसिया कम्पाऊंडर येथे घडली. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमनदलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट नाही.

    दुपारी आग शीळ डायघर भागात लागली. या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आणि गोडाऊन आहेत. येथे छोटे-मोठे व्यापारी आपली काम करतात. तसेच इथे केमिकल आणि कापडाचेही गोडाऊन मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत परिसरातचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आग कशी लागली यावर पोलिस तपास करत आहेत. ही आग लावली असल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे.

Trending