आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलीशी अवैध संबंधांचा संशय, पती-पत्नी अन् मुलाने मिळून तरुणाचे केले 9 तुकडे, 4 पोत्यांमध्ये भरून लावली विल्हेवाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीहोर (एमपी) - 2 दिवसांपूर्वी नरेश मंडलोई यांच्या मृतदेहाचे तुकडे पोत्यात आढळल्याच्या घटनेचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. नरेश यांची हत्या अवैध संबंधांच्या संशयामुळे झाली होती. आरोपी सोहेलला संशय होता की, नरेशचे त्यांच्या मुलीशी अवैध संबंध आहेत. नरेश 11 नोव्हेंबरपासून आपल्या घरी पोहोचले नव्हते. यादरम्यान जेव्हा तो सीहोरला गेला तेव्हा रात्रीतून आरोपी सोहेलशी त्याचा वाद झाला. यानंतर सोहेलने नरेशच्या छातीत चाकू भोसकून त्याची हत्या केली. 

 

आरोपीसोबत त्याची पत्नी इसरत आणि मुलगा अमनने नरेशच्या मृतदेहाचे 9 तुकडे करून पोत्यात भरले. ते पोते त्यांनी करबला पुलाजवळ फेकून दिले होते. तथापि, चौकशीदरम्यान पोलिसांवर दबाव आणण्यासाठी मुख्य आरोपीने विषारी पदार्थ खाल्ला होता, यामुळे सीहोरला आणताना त्याचा मृत्यू झाला. रविवारी पोलिसांनी आरोपीची पत्नी आणि मुलालाही अटक केली आहे. 


11 नोव्हेंबरपासून घरी नव्हता आला नरेश, नंतर मिळाला मृतदेह
अॅडिशनल एस. पी. समीर यादव म्हणाले की, कोठरी गावातील रहिवासी नरेश मंडलोई (30 वर्षै) 11 नोव्हेंबरपासून घरी पोहोचले नव्हते. नरेश यांच्या भावाने आष्टा पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. परंतु शुक्रवारी करबलाच्या जवळ पोलिसांना तुकड्यांमध्ये एक मृतदेह मिळाला. तो नरेश मंडलोईच असल्याचे आढळले होते. 


आरोपीला चौकशीसाठी आणले, मग त्याने खाल्ला विषारी पदार्थ
नरेश बेपत्ता झाल्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी सोहेलच्या कुटुंबीयांना आष्टा पोलिस चौकीत आणले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी सोहेल तब्येत बिघडलेली असल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. आजारपणाचा बहाणा करत पोलिसांना काहीही सांगण्यात त्याने नकार दिला. परंतु सोहेल सतत मोबाइलवर बोलत होता. यामुळे पोलिसांचा संशय वाढला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी आष्टा चौकीत आणले. यादरम्यान सोहेलने विषारी पदार्थ गिळला.

 

यूसुफची पत्नी इसरत अन् मुलगा अमनने कबूल केला हत्येचा गुन्हा
एएसपी यादव म्हणाले की, सीहोरच्या दूल्हा बादशाह कॉलनीतील रहिवासी सोहेल जमाल याची 48 वर्षीय पत्नी इसरतबी आणि मुलगा अमनने नरेशची हत्या केल्याचे कबूल केले आहे. या हत्येतील मुख्य आरोपी हा सोहेल होता. चौकशीत असेही समोर आले होते की, सोहेलला मृत नरेशचे आपल्या मुलीशी अवैध संबंध असल्याचा संशय आला होता.


सोहेलवरच होता नरेशच्या कुटुंबीयांचा संशय...
सूत्रांनुसार, मृत नरेशने फोनवर आपल्या भावाला सांगितले होते की, तो सीहोरमध्ये सोहेलच्या घरी आहे. परंतु दुसऱ्या दिवशी सोहेलच्या कुटुंबीयांना नरेश आल्याचे नाकारले. यानंतरच सोहेलनेच नरेशचा मोबाइल भोपाळच्या लालघाटीजवळ आढळल्याची माहिती दिली होती. यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...