आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 वर्षांची मुलगी अन् 30 वर्षांच्या तरुणाचे लग्न, प्रत्येकाला बसला धक्का, पण सत्य समोर येताच सर्वांच्या डोळ्यात तरळले अश्रू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटन - ब्रिटनमध्ये राहणारा 30 वर्षीय एक ट्रेनी डॉक्टर आणि 4 वर्षीय चिमुरडीच्या लग्नामुळे सर्वांना धक्का बसला होता. या अजब लग्नाबाबत ज्याने ऐकले, तो प्रत्येक जण चकित झाला. परंतु, सत्य समोर आल्यावर सर्वच भावुक झाले. वास्तविक, येथील एका खासगी रुग्णालयात अॅबी नावाची 4 वर्षांची चिमुरडी अॅडमिट होती. अॅबीला ब्लड कॅन्सर (leukemia) झालेला होता. येथे तिची देखभाल 30 वर्षीय ट्रेनी डॉक्टर मॅट करत होता. मॅट एवढ्या कमी वयाच्या मुलीला एवढ्या भयंकर आजाराने ग्रासलेले पाहून उदास होता. 

 

जेव्हा अॅबी म्हणाली, मला मॅटशी लग्न करायचे...
- अॅबीची देखभाल करताना दोघांमध्ये छान गट्टी जमली होती. मॅटला पाहून अॅबीही खुश व्हायची. एका दिवशी अबोध अॅबीने आपल्या आईला म्हटले की, तिला मॅटशी लग्न करायचे आहे. ही गोष्ट ऐकून अॅबीची आई जोरजोरात हसू लागली. तिला वाटले की, मुलगी समज नसल्याने असे बोलत आहे.

- परंतु, निरागस अॅबीने मॅटशी लग्न करण्याचा लकडाच लावला. आईला माहिती होते की, त्यांची परी जास्त दिवस सोबत राहणार नाही. यामुळे त्यांनी तिची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. अॅबीच्या आईने हे सर्व डॉक्टर मॅटला सांगितले. मॅटसुद्धा चकित होता. यावर तो तिचे मन दुखावू नये म्हणून लग्न करायला तयार झाला.

 

हॉस्पिटल रुम सजली लग्नासाठी
- मॅटला माहिती होते की, अॅबीजवळ आयुष्यातील काहीच दिवस राहिले आहेत. यामुळे त्याने चिमुरडीचे मन ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्याने हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांसोबत मिळून अॅबीची रूम सजवली. छोटुकली नवरीही सजवण्यात आली. मग वधु बनलेल्या लहानग्या अॅबीला फुलांचा गुच्छ देऊन मॅटजवळ नेण्यात आले. विचारले की, "तू माझ्याशी लग्न करशील?" मॅटने चिमुरडीला छातीशी लावले. यामुळे मृत्यूच्या दारात उभी असलेली अॅबी एवढी खुश झाली की, हे दृश्य पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.


मॅटने फेसबुकवर शेअर केली इमोशनल स्टोरी
मॅटने हा अद्भुत क्षण असल्याचे सांगत फेसबुकवर लिहिले, माझ्या एका पेशेंटची आई माझ्याकडे अनोखी डिमांड घेऊन पोहोचली होती. त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या लहान मुलीला माझ्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. मला माहिती होते की, चिमुरडीची प्रकृती नाजुक आहे, यामुळे मीही तिचा हट्ट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. युजर्सनी मॅटचे भरभरून कौतुक केले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...